RG Kar Rape and Murder Case : देशाला हादरवणाऱ्या कोलकत्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार व हत्या प्रकरणात कोर्टाने संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षी सुनावली आहे. त्यामुळे संजय रॉयला मरेपर्यंत जेलमध्ये रहावे लागणार आहे. कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा निकाल दिला आहे. तसेच पिडीतेच्या कुटुंबियांनी भरपाई घेण्यास नकार दिला आहे.
कोलकात्यातील बहुप्रतीक्षित आरजीकर बलात्कार प्रकरणाचा निकाल लागला आहे. न्यायाधीशांनी संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ५० हजार रुपयांचा दंडही आरोपीला ठोठावण्यात आला आहे. गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी एका ३२ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. कोलकाता पोलिसांकडून हे प्रकरण ताब्यात घेतलेल्या सीबीआयने रॉय यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु न्यायाधीश अनिर्बन दास यांनी निकाल देताना सांगितले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही. त्याआधारे त्यांनी आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांना १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
आरोपी रॉय याने मात्र, कोर्टात तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. मला विनाकारण या प्रकरणात अडकवले जात असल्याचं त्याने न्यायालयाला सांगितले. मी रुद्राक्ष माळ घालत असून जर मी गुन्हा केला असता तर तो गुन्ह्याच्या ठिकाणी काही भलतचं झालं असतं असा दावा त्याने केला आहे. तसेच त्याला बोलण्याची संधी देण्यात आली नाही असा आरोप देखील त्याने केला आहे. मला कागदावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. मला बोलण्याची संधीच मिळाली नाही. सर, तुम्हीही हे सगळं पाहिलं आहे. मी तुम्हाला आधी ही सांगितलं आहे, अस त्यांनं शिक्षा जाहीर झाल्यावर न्यायाधीशांना सांगितलं.
न्यायाधीश अनिर्बान दास यांनी शनिवारी रॉय यांना दोषी ठरवलं होतं आणि निकाल देण्यापूर्वी त्यांचा युक्तिवाद ऐकून घेऊ असं देखील सांगितलं होतं. रॉयला किमान जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे ते म्हणाले होते. सोमवारी न्यायाधीशांनी सांगितलं की, कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल. रॉय यांच्याशी बोलतांना न्यायाधीश म्हणले, मी ३ तास तुझं बोलणं ऐकलं होतं. तुमच्या वकिलांनी तुमची बाजू मांडली. आरोप सिद्ध झाले आहेत. आता मला शिक्षेबाबत तुमचे मत जाणून घ्यायचे आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती दास यांनी आरोपी रॉयल भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम ६४, ६६ आणि १०३ (१) अन्वये दोषी ठरवले. सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती केली. लोकांचा समाजावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केल्याचे एजन्सीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
सीबीआयने या प्रकरणी फॉरेन्सिक तपासणीद्वारे सिद्ध केले की पीडितेच्या नखात सापडलेले नमुने संजय रॉयच्या डीएनएशी जुळले. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज व ब्लूटूथ हेडफोन्ससारखे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. यावरून हे सिद्ध झाले की संजय रॉय हा एकटाच या गुन्ह्यात सहभागी होता.
आरजी कार बलात्कार हत्या प्रकरणात निकाल देऊन देखील कोर्टाबाहेर नागरीकांनी आंदोलन सूरूच ठेवलं आहे. खरं तर आंदोलकांनी या प्रकरणाक संजय रॉय सोबत अनेक आरोपी होती. त्यामुळे त्यांना देखील शिक्षा द्यावी,अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
संबंधित बातम्या