मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Telangana New CM : ठरलं तर..! रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; ‘या’ दिवशी घेणार शपथ

Telangana New CM : ठरलं तर..! रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; ‘या’ दिवशी घेणार शपथ

Dec 05, 2023 04:57 PM IST

Revanth Reddy Telangana New CM : तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी यांची निवड जवळपास निश्चित झाली असून गुरुवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Revanth reddy
Revanth reddy

रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रेवंत रेड्डी तेलंगणा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षही आहेत. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंत होते. ते  गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. वरिष्ठ नेते उत्तम कुमार रेड्डी आणि भट्टी विक्रमार्क  यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला होता. मात्र पार्टी हायकंमाडने त्यांना उपमुख्यमंत्री किंवा चांगले मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने तेलंगाणात रोटेशनल सीएम पद्धत स्पष्टपणे नाकारली आहे. 

तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पराभूत करून घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले आहे. तेलंगणाच्या निर्मितीपासून सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या के. चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने धक्का दिला आहे. तेलंगणामधील काँग्रेसच्या या विजयाचे श्रेय रेवंथ रेड्डी यांना दिले जात आहे. विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. अखेर काँग्रेसने विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 

तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे  अध्यक्ष रेवंत रेड्डी यांना पहिल्यापासून मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते.

ट्रेंडिंग न्यूज

एबीव्हीपीपासून राजकीय जीवनास सुरूवात - 

 रेवंत रेड्डी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९६७ रोजी आंध्र प्रदेशमधील महबूबनगरमध्ये झाला. रेड्डी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात एबीव्हीपीमधून केली. त्यानंतर ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीत सामील झाले. २००९ मध्ये आंध्रातील कोडांगलमधून टीडीपीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून गेले. २०१४ मध्ये ते तेलंगाना विधानसभेत टीडीपीचे विधीमंडळ नेतेपदी निवडले गेले.

२०१७ मध्ये रेवंत रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले. २०१८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मलकाजगिरी मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी देत प्रदेश अध्यक्ष बनवले.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर