मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान, १२ मंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा संपूर्ण यादी

Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान, १२ मंत्र्यांनी घेतली शपथ, पाहा संपूर्ण यादी

Dec 07, 2023 02:44 PM IST

Revanth Reddy New CM Of Telangana :काँग्रेस नेते रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहे. हैदराबाद शहरातील LB स्टेडियममध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात तेलंगणाच्या राज्यपाल टी. सौंदरराजन यांनी त्यांनी पद गोपनीयतेची शपथ दिली.

Revanth Reddy New CM Of Telangana
Revanth Reddy New CM Of Telangana

Telangana CM Revanth Reddy : काँग्रेसच्या तेलंगाणा विजयाचे शिल्पकार ठरलेले रेवंत रेड्डीयांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदा शपथ घेतली. त्याचबरोबर भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी रेवंत रेड्डी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी हा शपथग्रहन समारंभ हैदराबादमधील एलबी स्टेडियमवर पार पडला.

 

ट्रेंडिंग न्यूज

या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून रेवंत रेड्डी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रेवंत रेड्डी तेलंगणामधील पहिलेच काँग्रेसी मुख्यमंत्री आहेत. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत.

रेवंत रेड्डी यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री –

भट्टी विक्रमार्क मल्लू-उपमुख्यमंत्री
नालामाडा उत्तम कुमार रेड्डी
सी दामोदर राजनरसिम्हा
कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी
दुद्दिला श्रीधर बाबू
पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी
पूनम प्रभाकर
कोंडा सुरेखा
डी अनसूया सीताक्का
तुम्मला नागेश्वर राव
जुपल्ली कृष्णा राव
गद्दाम प्रसाद कुमार.

 

तेलंगणाच्या ११९ विधानसभा जागांपैकी काँग्रेने ६४ जागांवर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने पूर्ण बहुमतातील सरकार बनवले आहे. भारत राष्ट्र समितीची १० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा दिला होता.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर