Hyderabad Crime : माणुसकीला हादरवून टाकणारी व क्रूरतेचा कळस गाठणारी एक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद झाल्याने पतीने तिची हत्या केली आहे. यानंतर आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून त्याची विल्हेवाट लावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत महिला ही आठवड्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता ही धक्कादायक घटना समोर आली.
ज्या व्यक्तीवर खुनाचा आरोप आहे, तो लष्करातून निवृत्त झाला आहे. सध्या सुरक्षा तो रक्षक म्हणून काम करत होता. त्याला अटक करण्यात आली असून पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याने ही हत्या केल्याचे कबूल केले आहे.
पुट्टवेंकट माधवी (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला १८ जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी पती गुरुमूर्ती यांना तिच्याबद्दल विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुले माधवीच्या आई-वडिलांनी मीरपेट पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या घरी जाण्यावरून पती आणि पत्नीचा वाद झाला होता. यानंतर रागाच्या भरात ती घराबाहेर पडली होती, अशी बतावणी आरोपी पती गुरुमूर्ती याने केली होती. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी मीरपेट पोलिस ठाण्यात नेले होते. या वेळी त्याने रागाच्या भरात पत्नी माधवी हीचा खून केल्याची कबुली दिली.
पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने माधवीच्या शरीराचे बाथरूममध्ये तुकडे केले. यासाठी त्याने घरातील धारधार चाकूचा वापर केला. यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे हे कुकरमध्ये शिजवले त्याने हाडे आणि मास वेगळे केले. यानंतर तिची हाडे बारीक करून पुन्हा उकळले. तब्बल तीन दिवस मांस आणि हाडे शिजवल्यानंतर त्याने ते एका पिशवीत भरून जवळच्या तलावात फेकून दिले.
त्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे फेकले तो तलाव दाखवला असून बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांना मीरपेट येथील तलावात मृत माहीलेच्या शरिराचे अवशेष सापडले नाही. गुरुमूर्तीने याच तलावात तिच्या शरीराचे तुकडे फेकल्याचा दावा केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी फॉरेन्सिक व श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.
गुरुमूर्ती यांचे माधवीशी १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे कुटुंब हैदराबादमधील जिलेलागुडा येथे राहत होते. खुनाच्या दिवशी त्यांची दोन मुले मावशीला भेटायला गेली होती. त्यानंतर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी माहिती तिच्या पालकांना दिली. गुरुमूर्तीला अटक करण्यात आले आहे. मीरपेटचे एसएचओ के. नागराजू यांनी सांगितले की, संशयित हत्येचा कोणताही पुरावा सापडला नसल्याने पोलिस अद्याप बेपत्ता म्हणून या प्रकरणाचा तपास करत आहे.
संबंधित बातम्या