Resignation Letter: पश्चिम आफ्रिकन देश घाना येथील एका व्यक्तीशी संबंधित एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही व्यक्ती नासुता वसा शहरातील असल्याचे सांगण्यात येत असून त्याने काही दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला. परंतु, राजीनामा पत्रात त्याने अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत की, ते वाचून तुम्हाला हसू आवरत नाही. काही राजीनाम्यांमध्ये कर्मचारी नोकरी सोडण्याचे कारण कौटुंबिक समस्या सांगतात. काही राजीनाम्यांमध्ये दुसऱ्या संस्थेत जाण्याची कारणे किंवा अन्य काही सांगितले जात आहेत. पण अशा मजेशीर पोस्ट्स क्वचितच पाहायला मिळतात.
व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये कर्मचारी राजीनामा पत्र लिहिताना प्रामाणिकपणा दाखवतो. त्याने आपल्या पत्रात लिहिले आहे की, सध्या मी कंपनी सोडत आहे. पण काही गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत. तर, मी नक्की या कंपनीत परत येईल, असे त्याने म्हटले आहे. @wallstreetoasis नावाच्या हँडलने हे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे पत्र २३ सप्टेंबरचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोस्टला ३८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.
'मला एका नवीन कंपनीत नोकरी मिळाली आहे. मला एकदा त्या कंपनीत काम करायचे आहे. तिथल्या गोष्टी मला पटल्या नाही तर, मी परत येईन. मी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो. कंपनीला माझ्या शुभेच्छा.'
एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, भावाने त्याचा बी प्लान आधीच तयार केला आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले आहे की, तो पुन्हा जुन्या कंपनीत परत येईल, हे ऐकून आनंद झाला. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, तू पुन्हा या कंपनीत नोकरीसाठी आलास तर, तुला कमी पगारात काम करावे लागेल. अशा अनेक कमेंट या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या