मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रिझर्व्ह बँकेनं OLA ला ठोठावला दीड कोटींचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण?

रिझर्व्ह बँकेनं OLA ला ठोठावला दीड कोटींचा दंड; काय आहे नेमकं प्रकरण?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 13, 2022 09:56 AM IST

RBI Imposes Penalty on Ola : ओला कंपनीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई करण्याआधी आरबीआयनं ओला कंपनीला नोटिस जारी केली होती.

RBI Imposes Penalty on Ola
RBI Imposes Penalty on Ola (HT)

RBI Penalty on Ola : आर्थिक नियमांचं पालन न केल्यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ओला फायनांशियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १.५ कोटींचा दंड ठोठावला आहे. आर्थिक व्यवहारातील आणि केवायसी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला दंड ठोठावण्यात आल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. ओला ही खाजगी पद्धतीनं कॅब उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. याशिवाय ओला कंपनीमार्फत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीशिवाय दीर्घ मुदतीचं कर्जही ग्राहकांना देण्यात येतं.

RBI ने याआधी नोटिस जारी केली होती...

ओला कंपनी आर्थिक नियमांचं पालन करत नसल्याचं जेव्हा आरबीआयच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ओला कंपनीला नोटिस जारी केली होती. त्यानंतरच कंपनीवर दीड कोटींचा दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

ओला कंपनीवर लावण्यात आलेल्या दंडाबाबत आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं असून त्यात म्हटलंय की 'ओला कंपनीला जारी केलेल्या नोटिसनंतर त्यांच्या उत्तरानंतर आर्थिक नियम पाळले गेले नाहीत, हा निष्कर्ष त्यातून निघाला, त्यामुळं अशा कंपनीवर कारवाई करणं गरजेचं होतं.'

या सहकारी बँकांवरही आरबीआयनं लावला दंड...

आरबीआयनं आर्थिक नियमांचं पालन न केल्यामुळं ओला कंपनीशिवाय तीन सहकारी बँकांवरही कारवाई केली आहे. या बँकांमध्ये 'द नासिक मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक', 'महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक आणि नेशनल सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड' या सहकारी बँकांचा समावेश आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग