Republic Day 2025 Parade Online Ticket: भारतात दरवर्षी २६ जानेवारी रोजी आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी दिल्लीत परेड आणि बीटिंग रिट्रीटच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम पाहण्यासाठी भारतीयांची मोठी गर्दी असते. या कार्यक्रमाच्या तिकिटांची सरकारी पोर्टलच्या माध्यमातून २ जानेवारी २०२५ पासून विक्री केली जात आहे. याशिवाय, या कार्यक्रमांचा अनेक चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट सुरु असतो, जेणेकरून प्रत्येक भारतीयाला या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.
परेडसाठी तिकिट बुक करण्याची किंमत २० रुपयांपासून सुरू होते. याबाबत संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.
ज्या लोकांना ऑफलाइन पद्धतीने तिकीट बुक करायचे आहे, त्यांच्यासाठी दिल्लीत अनेक ठिकाणी फिजिकल बूथ आणि काउंटर तयार करण्यात आले. ऑफलाइन तिकीट बुक करण्यासाठी संबंधित व्यक्तीने ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या