Indian Republic Day 2025: दरवर्षीप्रमाणे येत्या २६ जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळील कार्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची भव्य परेड पाहण्यासाठी देश आतुरतेने वाट पाहत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या सहभागी होणार आहेत. याचपार्श्वभूमीवर भारतात यावर्षी साजरा करण्यात येणारा प्रजासत्ताक दिन नेमका कितवा आहे? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.
या परेडमध्ये विविध राज्यांचे चित्ररथ देखील असतील, जे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहेत. दरम्यान, १ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून मान्यता देण्यात आली. प्रजासत्ताक होण्याचा पहिला वर्धापनदिन २६ जानेवारी १९५१ रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी भारत राज्यघटना स्वीकारल्याला ७५ वर्षे पूर्ण करत आहे. यामुळे यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल.
दरवर्षी भारत सरकार या उत्सवासाठी एक विशिष्ट थीम ठरवते. यंदाची थीम भारताची समृद्ध संस्कृती आणि वारसा आणि गेल्या काही वर्षांतील प्रगतीवर केंद्रित आहे. प्रजासत्ताक दिन २०२५ साठी आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेशसह १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश कर्तव्यपथावर आपली चित्ररथ सादर करतील. याशिवाय, भव्य परेडमध्ये केंद्र सरकारच्या ११ तुकड्या सहभागी होणार आहेत.
२६ जानेवारी २०२५ रोजी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतोइस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंडोनेशियाच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त होणार आहे.
२६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देशाचे राष्ट्रपती या कार्यक्रमात सहभागी होतात आणि या दिवशी ध्वजारोहण करतात. यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला.
संबंधित बातम्या