मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Republic Day 2023 : अवकाशाला गवसणी घालूनही आमचे पाय जमिनीवर, राष्ट्रपतींनी व्यक्त केला नवा विश्वास
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

Republic Day 2023 : अवकाशाला गवसणी घालूनही आमचे पाय जमिनीवर, राष्ट्रपतींनी व्यक्त केला नवा विश्वास

25 January 2023, 19:55 ISTShrikant Ashok Londhe

President droupadi murmur address nation : राष्ट्रपतींनी ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. यामध्ये त्यांनी भारत जगातील पहिल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे म्हटले.

President Droupadi Murmu address Nation: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला उद्देशून संबोधन केले. आपल्या भाषणाच्या सुरूवातीला राष्ट्रपतीने म्हटले की, ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशात व परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शुभेच्छा. जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, तेव्हा एका देशाच्या रुपात आपण सर्वांनी मिळून जी प्रगती केली आहे, त्याचा उत्सव साजरा करतो.

ट्रेंडिंग न्यूज

७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, "आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व भारतीय आहोत. अनेक पंथ आणि अनेक भाषांनी आपल्याला विभाजित केले नाही तर एकत्र आणले आहे. त्यामुळेआपण यशस्वी झालो आहोत. लोकशाही प्रजासत्ताक म्हणून. हेच भारताच्या प्रगतीचे सार आहे.

ते म्हणाले, भारताची प्रगती एका गरीब आणि अशिक्षित राष्ट्रातून जागतिक स्तरावर आत्मविश्वास पूर्ण राष्ट्र म्हणून झाली आहे. ही प्रगती राज्यघटनेच्या रचनाकारांच्या सामूहिक बुद्धीच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाली नसती.

 

राष्ट्रपतींनी कोविड महामारीनंतरही अर्थव्यवस्थेतील वाढीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, गेल्यावर्षी भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या जागतिक पार्श्वभूमीवर हे यश प्राप्त झाले आहे. सक्षम नेतृत्व आणि प्रभावी संघर्षाच्या बळावर आम्ही लवकरच मंदीतून बाहेर आलो आणि आमचा विकासाचा प्रवास पुन्हा सुरू केला.

राष्ट्रपती म्हणाल्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकविसाव्या शतकातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करते, आपल्या सभ्यतेवर आधारित ज्ञानाला समकालीन जीवनाशी सुसंगत बनवते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या कामगिरीचा आपण अभिमान बाळगू शकतो. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत हा काही आघाडीच्या देशांपैकी एक आहे. महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता या आता केवळ घोषणा नाहीत. उद्याचा भारत घडवण्यात स्त्रिया जास्तीत जास्त योगदान देतील, यात माझ्या मनात शंका नाही.