मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Republic Day 2023: आज ७४वा प्रजासत्ताक दिन, कसा असेल दिल्लीतील कार्यक्रम? संपूर्ण माहिती

Republic Day 2023: आज ७४वा प्रजासत्ताक दिन, कसा असेल दिल्लीतील कार्यक्रम? संपूर्ण माहिती

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 26, 2023 10:23 AM IST

Republic Day 2023: भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Indian Republic Day
Indian Republic Day

Republic Day 2023: भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. यंदा आपला ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. आजच्याच दिवशी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स सहभाही होतात. याशिवाय, आजच्या दिवशी देशभरात तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे, आपण भारतीय एकतर अनेक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. संविधान सभेने १९५० मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. त्यांनी १९५२ मध्ये पहिली आणि १९५७ मध्ये दुसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.

IPL_Entry_Point

विभाग