Reporter Slaps Herself During Live Broadcast: लाइव्ह रिपोर्टिंग करताना एका महिला पत्रकाराने स्वत:च्या तोंडात मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियाच्या 'द टुडे शो'च्या रिपोर्टर अँड्रिया क्रॉथर्स ब्रिस्बेनमधील पुराचे वार्तांकन करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर डास चावला. तिने डासाला पळवण्याचा प्रयत्न केला असता स्वत:च्या तोंडात मारली.
लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकारने स्वतःच्या तोंडात मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पण लाइव्ह टीव्हीवर महिला पत्रकारने स्वत:च्या तोंडात का मारले का मारली, हे ऐकून तुम्हाला हसू येईल. महिला पत्रकार रिपोर्टिंग करत असताना तिच्या नाकावर एक डास बसला. यावेळी डासला चेहऱ्यावरून हटवण्याच्या प्रयत्नात महिला पत्रकाराने चुकून स्वत:च्या तोंडात मारली. अँड्रियाने या घटनेचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आणि त्यावर मजेशीर कमेंट्स येत आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रॉदर्सने ब्रिस्बेनमधून लाइव्ह रिपोर्टिंग करतानाची आणखी एक क्लिप गमतीने शेअर केली. या व्हिडिओमध्ये ती डासांच्या संभाव्य हल्ल्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी जाळीदार बुरखा परिधान करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, " कंपनीच्या एचआरने तिला या गोष्टीसाठी मान्यता दिली आहे. दोन्ही व्हिडिओंना भरपूर व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये ही आपले विचार मांडले.