iPhone News: पालकांनी आयफोन खरेदी करून द्यावा म्हणून एका १९ वर्षीय तरुणीने उपोषण केल्याची माहिती समोर आली आहे. रेडिट युजरने आपल्या १९ वर्षीय चुलत बहिणीबद्दल सांगताना असे म्हटले आहे की, जो पर्यंत आई-वडिलांनी तिच्यासाठी आयफोन विकत घेतला नाही, तोपर्यंत तिने खाणे बंद केले. हे पाहून तरुणीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
रेडिट युजर आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझी चुलत बहिण (वय,१९) गेल्या दोन दिवसांपासून जेवत नाही. तिला आयफोन हवा आहे. तिच्या आई-वडिलांनी होकार दिला आणि तिला सांगितले की, आज बँकेला सुट्टी आहे. मात्र, त्यानंतर तिने पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात केली. काकांना अश्रू अनावर झालेले मी कधीच पाहिले नाहीत. ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी मुलीला आयफोन घेण्यासाठी कसेबसे पैसे जमावले आहेत आणि आता ते तिला आयफोन घेऊन देणार आहेत.
ही पोस्ट १९ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून या पोस्टला आतापर्यंत लाईक्स केले आहे. तर, जवळपास २००० लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही पोस्ट आता वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पोस्टवर आपली प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, आपल्या काकांना सांगा की, तिच्यासाठी आयफोन खरेदी करू नका, नाहीतर पुढे जाऊन ती आणखी कशाचीही मागणी करेल आणि त्यांना ती पूर्ण करावी लागेल. दुसऱ्याने म्हटले आहे की, एकलुती एक मुलगी असली म्हणून काय झाले, उद्या ती कोहिनूरचा हिरा मागेल, मग कसे आणणार. तिसऱ्या युजरने असे म्हटले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागिरकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट वाढल्या आहेत. ज्यामुळे युजरला लाइक्स आणि कमेंट मिळतात.
या पोस्टवर आणखी एकाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणााले की, 'यात मुलीपेक्षा तिच्या आई- वडिलांची अधिक चूक आहे. मी १८ वर्षाचा आहे आणि मलाही आयफोन आवडतो, पण मला याची जाणीव आहे की, आई- वडील मला आयफोन विकत घेऊ शकत नाहीत. दिल्ली विद्यापीठातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मला कोणता फोन हवा होता, त्यावेळी वडिलांना स्पष्ट सांगितले की, 'तुम्हाला जो परवडेल तो मी घेईन.' त्यांनी मला एक चांगला सॅमसंग ए ३५ हा स्मार्टफोन भेट दिला. मला खूप आनंद झाला कारण तो माझा पहिला फोन होता. नंतर मला कळाले की, त्यांनी हा फोन फायनान्सवर विकत घेतला आहे. मी लगेच त्यांना फोन परत करण्यास सांगितले आणि म्हणालो की, 'तुम्हाला परवडेल तोच फोन माझ्यासाठी घ्या.' त्याने मला त्याचे बजेट सांगितले आणि मी त्याऐवजी सॅमसंग एम ३४ खरेदी केला. त्याला माझा खूप अभिमान वाटला. आपण आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि स्वतःच्या इच्छेसाठी त्यांच्यावर कधीही दबाव आणू नये, कारण आपण केवळ स्वतःसाठी सौदेबाजी करू नये. कुटुंबाच्या भल्याचा ही विचार केला पाहिजे. मला तुझ्या काकांबद्दल ऐकून खूप वाईट वाटले!'