Heatwave in Brazil : ब्राझीलमध्ये उष्णतेची लाट आली आहे. येथील तपमानाने उच्चांक गाठत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सध्या राजधानी रिओ डी जनेरियोचा उष्णतेचा पारा हा तब्बल ६२.६३ डिग्री अंश सेल्सिअस (१४४.१ अंश फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचला आहे. गेल्या दशकातील हे सर्वाधिक तापमान आहे. या उन्हामुळे नागरिकांची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरीक समुद्र किनारी गर्दी करत आहेत.
ब्राजीलमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तापमानात कमालीची वाढ नोंदवली गेली आहे. येथील पारा दरवर्षी उच्चांक गाठत आहेत. येथील वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढले आहे. सोमवारी शहरातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस होते, असे येथील हवामान विभागाने सांगितले.
ब्राजीलची राजधानी रिओच्या पश्चिम भागात रविवारी सकाळी ९ वाजता ६२.३ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. २०१४ मध्ये अलर्टा रिओने या संस्थेने देशातील तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात केली असून आता पर्यन्तचे हे सर्वाधिक तापमान असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्राजीलमधील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्दीने फुलले आहेत. ऊनहापासून संरक्षण करण्यासाठी नागरीक हिलस्टेशन आणि समुद्रांच्या किनारी गर्दी करत आहेत. सध्या ब्राजीलमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. येथील ऋतुंमध्ये देखील मोठा बदल झाला आहे. ''भविष्यात ब्राजीलच्या परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. ही जागा राहण्याजोगी राहील की नाही याची भीती वाढत आहे. त्यात लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आणि वाढत्या जंगलतोडिमूळे परिस्थिती गंभीर होण्याची भीती, ४९ वर्षीय प्रशासकीय सहाय्यक रॅकेल कोरिया यांनी व्यक्त केले.
दरम्यान गेल्या वर्षी देखील येथील तापमान ५९.९ डिग्री सेल्सिअस पर्यन्त पोहचले होते. तर अतिवृष्टीने देखील देशाच्या दक्षिण भागात कहर केला होता. दरम्यान, हे तापमान पुढीलआठवड्या पर्यन्त कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
“ब्राझीलच्या मध्य-दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वादळामुळे मोठे नुकसान झले आहे. वातावरणातील हा बदल चिंताजनक आहे.
संबंधित बातम्या