Whatsapp Thumbs Up Emoji: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपवर (WhatsApp) शेअर केलेल्या पोस्टवर थम्स अप इमोजी (Thumbs Up Emoji) टाकल्याने समस्या निर्माण होऊ शकतात का? यावर मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही पोस्टवर थम्स अप इमोजी टाकणे हे त्या पोस्टचे समर्थन मानले जाऊ शकत नाही. तर, थम्स अप इमोजीा केवळ माहिती प्राप्त झाल्याची संकेत देतो.
२०१८ मध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल नरेंद्र चौहान यांनी असिस्टंट कमांडंटच्या हत्येशी संबंधित व्हॉट्सॲप मेसेजवर थम्स अप इमोजी पोस्ट केला होता. यानंतर आरपीएफने कॉन्स्टेबलला नोकरीवरून बडतर्फ केले. हा संदेश अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला होता. चौहान यांना पदावरून बडतर्फ करतानाआरपीएफने असा युक्तिवाद केला होता की चौहान यांनी इमोजी शेअर करणे म्हणजे अधिकाऱ्याच्या हत्येचे समर्थन आहे. चौकशीनंतर चौहान यांना पदावरून हटवण्यात आले.
याविरोधात चौहान यांनी २०२१ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. चौहान यांनी चुकून थम्सअप इमोजी पोस्ट केल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने गेल्या वर्षी दिला. यासोबतच चौहान यांना पुन्हा पदावर घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयाविरोधात आरपीएफने दुहेरी खंडपीठात याचिका दाखल केली.
न्यायमूर्ती डी कृष्णकुमार आणि आर विजयकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, थम्स अप इमोजीला 'ओके' शब्दाचा पर्याय म्हणून विचार केला जाऊ शकतो. थम्सअप इमोजाची अर्थ एखाद्याच्या हत्येला समर्थन दिल्याचे होत नाही.नोकरीवरून काढलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कॉन्स्टेबलला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. यापूर्वी, एकल खंडपीठाने मेघालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येशी संबंधित व्हॉट्सॲप संदेशावर थम्स अप इमोजी पोस्ट केल्याबद्दल सेवेतून काढून टाकलेल्या कॉन्स्टेबलला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले होते.
डायरेक्टर जनरल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स विरुद्ध नरेंद्र चौहान या खटल्याची सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले आहे की, "हत्येशी संबंधित कोणत्याही पोस्टवरील थम्ब्स अप इमोजी कोणत्याही परिस्थितीत निर्घृण हत्येचे समर्थन म्हटले जाऊ शकत नाही."