मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RBI: ३१ मार्चला रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहणार; आरबीआयकडून अधिसूचना जारी

RBI: ३१ मार्चला रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहणार; आरबीआयकडून अधिसूचना जारी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 20, 2024 09:46 PM IST

Banks remain Open on 31 March: ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ चा शेवटचा दिवस देशभरातील सर्व बँका खुले ठेवण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे.

येत्या ३१ मार्चला रविवार असूनही आरबीआयने सर्व बँका खुले ठेवण्याचा निर्णय घेतला.
येत्या ३१ मार्चला रविवार असूनही आरबीआयने सर्व बँका खुले ठेवण्याचा निर्णय घेतला.

No Bank Holiday on Sunday 31 March: बँकेशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली. येत्या ३१ मार्च २०२४ रविवार असूनही देशातील सर्व बँका सुरू राहणार आहेत. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकने अधिसूचना जारी केली. आरबीआयने म्हटले आहे की, सर्व एजन्सी बँका ३१ मार्च रोजी खुल्या असतील. भारत सरकारने सरकारी व्यवहाराशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा ३१ मार्च रोजी व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली, जेणेकरून पावत्या आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांचा लेखाजोखा करता येईल.

आरबीआयने एक्सवर ट्विट करून याबाबत माहिती दिली. बँकेने म्हटले आहे की, ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ चा शेवटचा दिवस आहे. यामुळे रविवार असतानाही सर्व बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया केंद्र आणि राज्य सरकारांचे सामान्य बँकिंग व्यवहार स्वतःच्या कार्यालयांद्वारे आणि एजन्सी बँकांच्या माध्यमातून करते.

कोणकोणत्या बँका सुरू राहणार?

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूको बँक,अॅक्सिस बँक लि., सिटी युनियन बँक लि., डीसीबी बँक लि., फेडरल बँक लि., एचडीएफसी बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., आयडीबीआय बँक लि., आयडीएफसी फर्स्ट बँक लि., इंडसइंड बँक लि., जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड, कर्नाटक बँक लि., करूर वैश्य बँक लि., आरबीएल बँक लि., कोटक महिंद्रा बँक लि., आरबीएल बँक लि., साऊथ इंडियन बँक लि., येस बँक लि., धनलक्ष्मी बँक लि., बंधन बँक लि, सीएसबी बँक लि., तमिळनाड मर्कन्टाइल बँक लि. सीएसबी बँक लि., डीबीएस बँक इंडिया लिमिटेड.

आयकर विभागाचे कार्यालयेही सुरु राहणार

दरम्यान, आयकर विभागानेही ३१ मार्च २०२४ रोजी सर्व कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.आयकर विभागाने या महिन्यात येणारा लाँग वीकेंड रद्द केलाय. या महिन्याच्या २९ तारखेला गुड फ्रायडे आहे आणि ३० मार्चला शनिवार आहे. पण आता या तिन्ही दिवशी आयकर विभागाचे कार्यालय खुले ठेवण्यात येणार आहे.

WhatsApp channel

विभाग