मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ravindra Jadeja: टीम इंडियाला मोठा धक्का, रवींद्र जडेजा वर्ल्डकपमधून बाहेर!

Ravindra Jadeja: टीम इंडियाला मोठा धक्का, रवींद्र जडेजा वर्ल्डकपमधून बाहेर!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 11, 2022 05:06 PM IST

Ravindra Jadeja Team India for T20 World Cup: अष्टपैलू रवींद्र जडेजा आता वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशनदेखील झाले. मात्र, या शस्त्रक्रियेतून जडेजा टी-२० विश्वचषकापर्यंत रिकव्हर होण्याची शक्यता नगण्य आहे. अशा स्थितीत तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा या आठवड्यात होऊ शकते. मात्र, त्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट आणि एक चांगली बातमी समोर येत आहे.

आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. या विश्वचषकासाठी त्यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. पण त्याचवेळी संघासाठी एक वाईट बातमीही समोर आली आहे. ती म्हणजे, दुखापतग्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आता वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. इनसाइडस्पोर्टच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

जडेजा वर्ल्ड कपमधून बाहेर

या अहवालात असे म्हटले आहे की, "जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशनदेखील झाले. मात्र, या शस्त्रक्रियेतून जडेजा टी-२० विश्वचषकापर्यंत रिकव्हर होण्याची शक्यता नगण्य आहे. अशा स्थितीत तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

काही दिवसांपूर्वी जडेजाने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्यासोबतच त्याने शस्त्रक्रियेचीही माहिती दिली होती. लवकरात लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जडेजाने पोस्टमध्ये सांगितले होते.

जडेजा वर्षभर दुखापतींशी झुंजत आहे

आशिया चषकापूर्वी आयपीएल २०२२ दरम्यानही रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अर्ध्या स्पर्धेतूनच बाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर जडेजाने इंग्लंड दौऱ्यातून मैदानात पुनरागमन केले होते. तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आता पुन्हा तो संघाबाहेर झाला आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे.

या तीन खेळाडूंपैकी एकजण जडेजाचा पर्याय असू शकतो

अक्षर पटेल : जडेजाऐवजी अष्टपैलू अक्षर पटेलच्या नावाला पहिली पसंती मानली जात आहे. अक्षरने याआधी २०१५ चा विश्वचषकही खेळला होता.

वॉशिंग्टन सुंदर : हा खेळाडूही दुखापतींमुळे बराच काळापासून संघाबाहेर आहे. आशिया चषकापूर्वी तो झिम्बाब्वेचा दौरा करणार होता, परंतु इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे चषक खेळताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो संघाबाहेर बाहेर पडला होता. आता त्याला संघात संधी मिळू शकते.

शाहबाज अहमद: शाहबाजला संधी मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे. कारण त्याला अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अष्टपैलू शाहबाजचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. पण शाहबाजने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. याचा विचार होऊ शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या