मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Traffic Rules : “मला दहा डोकी आहेत, तुमचं एक कापलं गेलं तर काय होईल”, जेव्हा रावण देतो ट्राफिकचे धडे

Traffic Rules : “मला दहा डोकी आहेत, तुमचं एक कापलं गेलं तर काय होईल”, जेव्हा रावण देतो ट्राफिकचे धडे

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Oct 05, 2022 12:04 PM IST

Ravan Teaching Traffic Rules To People Driving On Road : रावणात अहंकार होता. जो त्याच्या पतनाचे कारणही ठरला. आपल्यातही तोच अहंकार दडलेला असतो. विशेषतः जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा अनेक प्रसंगी, सर्वकाही माहीत असूनही आपण अनेक चुका करतो.

जेव्हा रावण देतो ट्राफिकचे धडे
जेव्हा रावण देतो ट्राफिकचे धडे (हिंदुस्तान टाइम्स)

आज दसरा आहे, त्यामुळे रावणाबद्दल बोलणे आवश्यक ठरेल. रावणात अहंकार होता. जो त्याच्या पतनाचे कारणही ठरला. आपल्यातही तोच अहंकार दडलेला असतो. विशेषतः जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा अनेक प्रसंगी, सर्वकाही माहीत असूनही आपण अनेक चुका करतो. जे पुढे आपल्या नुकसानाचे कारण बनते. गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये लोकांना वाहतुकीचे नियम शिकवण्यासाठी पोलीस चौकात ३० सेकंदांचे लोकजागृतीच्या नाटीका सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये रावणरुपी कलाकाराने लोकांना १० प्रकारचे उल्लंघन सोडण्यासाठी प्रेरित केले. अनेक राज्यांमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी यमराजांना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याच्या मागे धावायला लावले जाते. जेणेकरून लोकांना वाहतूक नियमांची जाणीव होईल.

लक्ष्मणही रावणासोबत गुरुग्राममध्ये उतरला.

गुरुग्राममध्ये ट्रॅफिकची समस्या इतकी मोठी झाली होती की, ४ वर्षांपूर्वी रावणासह लक्ष्मणही रस्त्यावर आले होते. दसर्‍याच्या एक दिवस आधी 'लक्ष्मण' आणि 'रावण' लोकांना त्यांच्या जीवावर प्रेम असेल तर वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगताना दिसले. घरी कोणीतरी त्यांची वाट पाहत आहे, त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी रस्त्यावर सुरक्षितपणे चाला, असा संदेश लोकांना देण्यात आला.हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकांना 'मला दहा डोकी आहेत, अर्धे कापले तरी फरक पडणार नाही, पण तुमचे एकच डोके आहे, त्यामुळे हेल्मेटचे महत्त्व समजून घ्या', असे समजावताना 'रावण' दिसला.

लोक या नियमांचे उल्लंघन करतात

ट्रॅफिकशी संबंधित नियम मोडणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांमध्ये हेल्मेट न घालणे, रेड लाईट जंपिंग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, दुचाकीमध्ये तिघांनी बसणे, डावीकडून ओव्हरटेक करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, धोकादायक/रॅश ड्रायव्हिंग, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंगमध्ये पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन यांचा समावेश आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या