मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  उंदरांनी ६० लाखांचं ड्रग्ज केलं फस्त; धक्कादायक घटनेनं पोलीस ठाण्यात खळबळ
rats consumed 581 kg of drugs in up
rats consumed 581 kg of drugs in up (HT)

उंदरांनी ६० लाखांचं ड्रग्ज केलं फस्त; धक्कादायक घटनेनं पोलीस ठाण्यात खळबळ

24 November 2022, 13:20 ISTAtik Sikandar Shaikh

Crime News In Marathi : पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करून जप्त केलेलं ड्रग्ज गोदामात ठेवलं होतं. परंतु उंदरांनी तब्बल साठ लाखांच्या ड्रग्जवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.

mathura up police station : विविध ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी जप्त केलेला ६० लाख रुपयांचं ड्रग्ज गोदामातील उंदरांनी फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा पोलीस ठाण्यात ही खळबळजनक घटना घडली असून उंदरांनी काही दिवसांतच ५८१ किलो ड्रग्जचं सेवन केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी विशेष नार्कोटिक्स ब्युरो न्यायालयात केला आहे. त्यामुळं आता या घटनेनं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गोदामातील जप्त केलेल्या साठ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उंदरांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर आता जिल्हा न्यायाधीशांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आठवड्याभरात या घटनेचा रिपोर्ट सादर करण्याचा मथुरा पोलिसांना दिला आहे. याशिवाय ड्रग्जचा लिलाव आणि विल्हेवाटासंदर्भात काही निर्देशही जारी केले आहेत. मथुरा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. त्याला पोलीस ठाण्यातील गोदामात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी गोदामातील उंदरांनी ड्रग्ज फस्त केल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी मथुरा पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला होता. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३८६ किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. यावेळी या साठ्याबाबत कोर्टानं पोलिसांना विचारणा केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विभाग