अरे देवा कसला हा आजार..! पाहून लोक घाबरतात तर काही हनुमानाचा अवतार म्हणूज पूजा करतात, कधी पाहिला आहे का असला माणूस?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अरे देवा कसला हा आजार..! पाहून लोक घाबरतात तर काही हनुमानाचा अवतार म्हणूज पूजा करतात, कधी पाहिला आहे का असला माणूस?

अरे देवा कसला हा आजार..! पाहून लोक घाबरतात तर काही हनुमानाचा अवतार म्हणूज पूजा करतात, कधी पाहिला आहे का असला माणूस?

Updated Feb 16, 2025 09:01 PM IST

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका तरुणाला पाहून काही जण घाबरतात, तर अनेक जण त्याला बजरंगबलीचे रूप मानून पूजतात. खरं तर हा तरुण एका अनोख्या आजाराने त्रस्त आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

या आजारामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर लांब आणि दाट केस येतात
या आजारामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर लांब आणि दाट केस येतात

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका तरुणाला पाहून काही जण घाबरतात, तर अनेक जण त्याला बजरंगबलीचे रूप मानून पूजतात. खरं तर हा तरुण एका अनोख्या आजाराने त्रस्त आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

रतलाम जिल्ह्यातील नंदलेटा या छोट्याशा गावचा रहिवासी असलेला ललित पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये पहिल्यांदा झळकल्यानंतर आता त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. ललितच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लांब आणि दाट केस आहेत. कधी केसांनी झाकलेल्या चेहऱ्यामुळे लोक घाबरायचे आणि चिडवायचे, तर काही जण बजरंगबलीचे रूप मानून पूजाही करायचे. आज संपूर्ण गावाची ओळख निर्माण केल्यानंतर सर्वजण त्याच्याशी प्रेमाने वागतात.

काय आहे आजार?

खरं तर ललितला एक आजार आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याचे केस ५ ते ६ सेंटीमीटरपर्यंत वाढतात. रतलाम जिल्हा मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या नंदलेटा गावात राहणारा १९ वर्षीय ललित पाटीदार हा वेअरवुल्फ सिंड्रोम (Hypertrichosis) नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या दुर्मिळ आजारामुळे त्याच्या चेहऱ्यावर असामान्य केस वाढतात. अख्खा चेहरा पांढऱ्या केसांनी झाकलेला असतो जणू ते एखाद्या चित्रपटातील पात्र आहे. त्यामुळेच ललित ‘वुल्फ मॅन’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. चेहऱ्यावरील लांब आणि दाट केसांमुळे ललितला श्वास घेण्यासही त्रास होत आहे. आता मात्र या केसांनी ललितला जगप्रसिद्ध केले आहे.

इटलीमध्ये झाला सन्मान -

ललित यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर ८ फेब्रुवारीला ललित आपला ओळखीचा जितेंद्र पाटीदार याच्यासोबत इटलीला गेला. ललित इटलीतील मिलान शहरात ६ दिवस राहिला. दरम्यान, तेथील तज्ज्ञांच्या पथकाने त्याची तपासणी केली. त्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या विशेष कार्यक्रमात त्याला सन्मान, प्रमाणपत्र आणि पदके देण्यात आली. गिनीज टीमच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर केसांचे सर्वाधिक प्रमाण २०१.७२/सेंमी² आहे आणि ते भारतातील ललित पाटीदार यांनी साध्य केले आहे. इटलीतील मिलान येथील लो शो देई रेकॉर्ड्सच्या सेटवर १३ फेब्रुवारी रोजी याची पडताळणी करण्यात आली.

ललितला जन्मजात आजार -

जन्मजात आजारामुळे ललितच्या तोंडावर आणि शरीरावर पांढरे केस वाढतात. असे केस ललितच्या जन्मापासून येतात. त्याला इतके केस येतात की, यामुळे त्याचे संपूर्ण शरीर केसांनी झाकलेले आहे. शरीर कपड्यांनी झाकलेले असते, मात्र चेहरा सर्वांना दिसत असतो. ललितचा आजार पहिल्यांदा २०१९ मध्ये जगासमोर आला होता.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ललितवर आता अनेक ब्लॉग तयार झाले आहेत. भारतातील अनेक राज्ये आणि शहरांव्यतिरिक्त परदेशातूनही लोक ललितला भेटायला त्याच्या नांदलेटा या गावी येतात. सुरुवातीला ललितला अडचणींचा सामना करावा लागला, पण आता तो सामान्य आयुष्य जगत आहे. ललितचे वडील शेतकरी आहेत. ललित एकदा या लूकमुळे चिडला होता. आता ललित म्हणतो की त्याला असेच जगायचे आहे आणि असाच राहील.

"माझे आई-वडील सांगतात की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी माझी मुंडन केली होती कारण माझ्या संपूर्ण शरीरावर लांब केस होते. पण मी सहा-सात वर्षांचा होईपर्यंत मला काही वेगळं वाटलं नाही. जेव्हा मी मोठा होऊ लागलो तेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आले की माझ्या संपूर्ण तोंडावर आणि शरीरावर  असे केस आहेत, जे अन्य लोकांच्या चेहऱ्यावर व अंगावर नाहीत.हे केस सतत वाढत होते.

जेव्हा मी घराबाहेर पडायचे, तेव्हा लोक माझ्यावर दगड फेकायचे, लोक आणि मुले घाबरायची की मी माकड किंवा अस्वलाप्रमाणे त्यांना चावायला येईन. रात्रीही लोक बघायला घाबरत असत. मग माझे आई-वडील मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. वयाच्या सहाव्या वर्षी तोंडावर आणि शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागावर असामान्य केस वाढत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी याला हायपरट्रायकोसिस असे नाव दिले. डॉक्टरांनी सांगितले की, जगात फक्त ५० लोक असे आहेत जे या आजाराने ग्रस्त आहेत.

 

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर