मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. रेशनकार्ड धारकांवर तिरंगा खरेदी करण्यासाठी सक्ती, वरुण गांधींनी शेअर केला व्हिडिओ

धक्कादायक.. रेशनकार्ड धारकांवर तिरंगा खरेदी करण्यासाठी सक्ती, वरुण गांधींनी शेअर केला व्हिडिओ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 10, 2022 09:15 PM IST

भाजपचे खासदारवरुण गांधीयांनीआरोपकेला आहे की, रेशन कार्ड धारकांना तिरंगा झेंडा खरेदी करण्यासाठी सक्ती केली जात आहे. हे दुदैवी आहे.

रेशनकार्ड धारकांवर तिरंगा खरेदी करण्यासाठी सक्ती
रेशनकार्ड धारकांवर तिरंगा खरेदी करण्यासाठी सक्ती

संपूर्ण देश स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी'हर घर तिरंगा' अभियान सुरू केले आहे.केंद्राने राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांना आवाहन केले आहे की, राष्ट्रीय नायकांप्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिना दिवशी लोकांना आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावण्यास प्रोत्साहित करावे.

दरम्यान भाजपचे खासदा रवरुण गांधी यांनी आरोप केला आहे की, रेशन कार्ड धारकांना तिरंगा झेंडा खरेदी करण्यासाठी सक्ती केली जात आहे. हे दुदैवी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गरीबांसाठी बोझ बनला आहे. त्यांनी ट्वीटकरून म्हटले आहे की, प्रत्येक भारतीयांच्या हृदयात वास करणाऱ्या तिरंग्याची किंमत गरीबांचा घास हिरावून वसूल करणे लाजीरवाणे आहे.

पीलीभीत मतदार संघातील खासदार वरूण गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की,‘स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव गरीबांसाठी बोझ बनणे दुदैवी आहे. रेशनकार्डधारकांना तिरंगा खरेदी करण्यासाठी मजबूर केले जात आहे. त्याबदल्यात त्यांच्या धान्यात कपात केले जात आहे.

हा व्हिडिओ हरियाणा राज्यातील कर्नाळ जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये काही रेशनकार्ड धारक तक्रार करत आहेत की, त्यांना २०रुपयात तिरंगा खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘‘हर घर तिरंगा’’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक देशवासीयाला आपल्या घरांवर १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग