मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ratan Tata News : रतन टाटा यांना हवी मुंबईकरांची मदत! इन्स्टाग्राम पोस्ट लिहून केलं कळकळीचं आवाहन

Ratan Tata News : रतन टाटा यांना हवी मुंबईकरांची मदत! इन्स्टाग्राम पोस्ट लिहून केलं कळकळीचं आवाहन

Jun 27, 2024 08:21 PM IST

Ratan Tata appeal to mumbaikars : जग प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर मुंबईकरांना मदतीचे आवाहन केले आहे. 'मला तुमच्या मदतीची खरोखर गरज आहे, असे टाटा यांनी म्हटले आहे.

 'मुंबई, मला तुमच्या मदतीची गरज आहे'! रतन टाटा कुणासाठी शोधत आहेत रक्तदाता ?
'मुंबई, मला तुमच्या मदतीची गरज आहे'! रतन टाटा कुणासाठी शोधत आहेत रक्तदाता ?

Ratan Tata news : देशातील तसेच जगातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईकरांना मदतीचे आवाहन केले आहे. तुम्ही म्हणाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या टाटा यांना मदतीची गरज का भासेल? मात्र, हे खरे आहे. रतन टाटा हे जितके मोठे उद्योजक आहेत तितकेच ते एक उदार व्यक्ती आहेत आणि मोठे श्वानप्रेमी देखील आहेत. एका आजारी कुत्र्यासाठी त्यांनी मुंबईतील नागरिकांना मदत मागितली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर लोकांना विनंती केली की मुंबईतील त्यांच्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कुत्र्याला रक्त हवे आहे. यासाठी ते रक्तदाता शोधत आहेत. यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी या बाबत सोशल मिडियावर पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे.

प्राण्यांना मदत करण्यात आघाडीवर असलेले उद्योगपती टाटा टाटा एका श्वानाच्या उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून मदत घेणार आहेत. त्यांची त्यांच्या सोशल मीडिया साईटवर लिहिले आहे की, 'मुंबई मला तुमच्या मदतीची गरज आहे. जखमी प्राण्यावर मुंबईतील स्मॉल ॲनिमल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वास्तविक, जखमी कुत्र्याला रक्तदात्याच्या शोधात रतन टाटा आहेत.

टाटा यांनी लिहिले, 'मला तुमच्या मदतीची खरोखर गरज आहे. पशु रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ७ महिन्यांच्या कुत्र्यासाठी रक्ताची गरज आहे'. टाटा यांनी ही पोस्ट शेअर केल्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टला ५ लाख लाईक्स मिळाले आहेत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय, नेटकरी त्यांची ही पोस्ट वेगाने शेअर करत आहेत.

पुढे, रक्तदान करणाऱ्या कुत्र्यालाही काही आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. रक्त देणारा श्वान वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असावा व त्याचे वय १ ते ८ वर्षांच्या दरम्यान असावे, त्याचे वजन सुमारे २५ किलो किंवा त्याहून अधिक असावे, त्याचे संपूर्ण लसीकरण झाले असावे, त्याला कोणताही मोठा आजार नसावा, या अटी पूर्ण करणारे कुत्रे रक्तदान करू शकतात.

WhatsApp channel
विभाग