मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  संतापजनक.. धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार, जखमी अवस्थेत व फाटक्या कपड्यात पीडिता पोहोचली पोलीस ठाण्यात

संतापजनक.. धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार, जखमी अवस्थेत व फाटक्या कपड्यात पीडिता पोहोचली पोलीस ठाण्यात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2024 02:48 PM IST

Rape In Moving Car : किशोरवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार करून तिला रस्त्यात सोडून आरोपीने पळ काढला. त्यानंतर पीडितेने फाटक्या कपड्यात पोलीस ठाणे गाठले.

धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार (सांकेतिक छायाचित्र)
धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार (सांकेतिक छायाचित्र)

देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याचे दिसून येत असून अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा जिल्ह्यात धावत्या कारमध्ये (Rape in moving car ) किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटने समोर आली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. बाह पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणाऱ्या मुलीवर इटावा जिल्ह्यातील बलराई पोलीस ठाणे क्षेत्रात शेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्याकिनारे सोडून तो पसार झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

पीडिता फाटक्या कपड्याता अनवाणी पायाने पोलीस ठाण्यात पोहोचली. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पीडितेने आपबिती पोलिसांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

ही घटना २४ एप्रिल रोजी घडली आहे. बाह क्षेत्रातील एका गावातील मुलीला शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीला फूस लावून पळवून नेले. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार २५ एप्रिल रोजी त्यांना समजले की, त्यांची मुलगी बलराई पोलीस ठाणे क्षेत्रात आहे. ते तेथे पोहोचल्यानंतर मुलीने तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याचे सांगितले. मुलीने सांगितले की, बलात्कारानंतर आरोपीने तिला गाडीतून खाली उतरवले व रस्त्याकडेला सोडून धूम ठोकली. 

त्यानंतर ती अनवाणी पायाने पोलीस ठाण्यात पोहोचली व संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पीडितेच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांकडेही या प्रकरणाची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ५ मे रोजी गुन्हा दाखल केला. बाहचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की,  बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विजेंद्र याला अटक करण्यात आली आहे.

दोन बहिणी चालवत होत्या आंतरराज्य सेक्स रॅकेट -

अरुणाचल प्रदेश पोलिसांनी एका आंतरराज्यीय वेश्वावृत्ती टोळीचा पर्दाफाश करत १० ते १५ वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. इटानगर पोलीस अधीक्षक रोहित राजबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या अल्पवयीन मुलींना दोन बहिणींनी शेजारचे राज्य आसाममधून तस्करी करून आणले होते. त्यांनी सांगितले की, आरोपी बहिणी इटानगरमध्ये एक ब्यूटी पार्लर चालवत होत्या.

IPL_Entry_Point

विभाग