मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  याला काय म्हणावं.. महिला पोलिसावरच बलात्कार, उपनिरीक्षकाने रिव्हॉल्वरच्या धाकावर केली जबरदस्ती

याला काय म्हणावं.. महिला पोलिसावरच बलात्कार, उपनिरीक्षकाने रिव्हॉल्वरच्या धाकावर केली जबरदस्ती

Jun 20, 2024 03:44 PM IST

Rape on female Police : तेलंगाणामध्ये बंदुकीच्या धाकावर महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस उपनिरीक्षकाचा महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार
पोलीस उपनिरीक्षकाचा महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

तेलंगाणामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सहयोगी महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. आरोपीने बंदूकीचा धाक दाखवून महिलेवर जबरदस्ती केली. आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडितेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तेलंगाणा पोलीस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भवानी सेन यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर महिला कॉन्स्टेबलला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १६ जून रोजीची आहे. आरोपीने जयशंकर भूपलपल्ली जिल्ह्यातील एका गेस्ट रूममध्ये महिला पोलिसावर बलात्कार केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

रिपोर्टनुसार, कालसेवाराम पोलीस ठाण्यात तैनात महिला कॉन्स्टेबलने याबाबत तक्रार दाखल केली होती. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, एसआय सेन याने रेप करण्यापूर्वी सर्विस रिवॉल्वर दाखवून तिला धमकी दिली होती. इतकेच नाही तर याबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला होता.

तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोप सत्य असल्याचे आढळले. त्यानंतर आरोपी एसआयविरोधात कारवाई केली गेली. आजी एव्ही रंगनाथ यांनी सेन यांना कायमस्वरुपी सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेशुद्ध झालेल्या कॉन्स्टेबलला रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस बनवत राहिले व्हिडिओ -

यूपी पोलीसमधील एक हेड काँस्टेबल उष्माघाताने चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षकही होते. त्यांनी हेड काँस्टेबलला रुग्णालयात पोहोचवण्याआधी त्यांची वीडियोग्राफी करायला सुरूवात केली. हवालदाराला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

पोलिस याचा व्हिडिओ बनवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. हवालदाराला आधी रुग्णालयात नेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी असे केले नाही. ते पोलीस हवालदाराचा व्हिडिओ बनवत राहिले. पोलिसांचा बेजबाबदारपणा यामुळे समोर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यावर चौकशीचे आदेश दिले आहेत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर