Rape attempt accused cuts off his private part : राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोकरण येथे बलात्काराच्या आरोपात एका दिव्यांग व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी या आरोपीने पोलीस कोठडीतच (police custody) आपला प्रायव्हेट पार्ट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कैद्याने गुप्तांग कापल्याचे समजताच पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. आरोपीची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला जोधपूरला हलवण्याचा सल्ला दिला आहे.
रविवारी पोकरण पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात अब्दुल वसीद नावाच्या एका व्यक्तीला रोडवेज बस स्टँडमधून अटक केली होती. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन ठाण्यात गेले. यादरम्यान आरोपीने आपल्या बॅगेतून ब्लेड काढून घेतले व आपल्याजवळ केले.
सोमवारी सकाळी लघवीला जाण्याचा बहाना करून त्याने आपला प्रायवेट पार्ट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रायवेट पार्टवर ब्लेड ओढल्याने आरोपी अब्दुल गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून याआधीही त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.
या प्रकणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोपाल सिंह भाटी यांनी सांगितले की, रविवारी रात्ती १० वाजण्याच्या सुमारास आरोपी अब्दुलला अटक करण्यात आली होती. सकाळी त्याने आपला प्रायवेट पार्ट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अब्दुल पोकरणपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पौपडिया गावचा रहिवासी आहे.
अब्दुल दिव्यांग आहे. आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने कुटूंबीयांनी त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. काही महिन्यापूर्वी त्याचा विवाहही झाला होता. मात्र पाच महिन्यातच त्याची पत्नी त्याला सोडून गेली. आता एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. यावेळी पोलीस कोठडीतच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.