मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pran Pratishtha : रामभक्तांची स्वप्नपूर्ती! अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू रामचंद्रांची विधीवत प्रतिष्ठापना

Pran Pratishtha : रामभक्तांची स्वप्नपूर्ती! अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू रामचंद्रांची विधीवत प्रतिष्ठापना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 22, 2024 01:54 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या नगरीत पार पडला. ८४ सेकंदाच्या मुहूर्तावर हा सोहळा विधिवत पार पडला.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरीत ऐतिहासिक राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापणा सोहळा हा पार पडला आहे. रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते ८४ सेकंदांच्या मुहूर्तात रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंडदिरांच्या गाभाऱ्यात करण्यात आली. संपूर्ण देशात हा सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे.

Raj Thackeray : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज ठाकरे म्हणाले, ‘आज कारसेवकांचे आत्मे…’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राम लल्लाचे प्रतीकात्मक डोळे उघडून अंतिम विधी पार पाडला. १६ जानेवारीपासून सुरू झालेला हा सोहळा आठवडाभर चालला. आज विधिपूर्वक हा अभिषेक सोहळा संपन्न झाला.

राम मंदिराच्या गर्भगृहात पीएम मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि श्री रामजन्मभूमी तीरथ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी पार पडले. त्यांना १२१ पूजऱ्यांनी मदत केली. मंदिराच्या गर्भगृहात धार्मिक विधी पार पडत असताना भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत पेटलवी तब्बल १०८ फूट लांब अगरबत्ती; पाहा फोटो

राम लल्लाची पूजा करण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी रविवारी रात्री तात्पुरत्या मंदिरातून राममंदिरात हलवण्यात आलेल्या रामलल्लाच्या जुन्या मूर्तीची पूजा करण्यासाठी वैदिक विधी देखील केले.

राम मंदिरात रामल्लांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी अवघ्या ८४ सेकंदांचा शुभ मूहूर्त होता. हा शुभ मुहूर्त २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटं ८ सेकंदांना सुरू होऊन तो दुपारी १२ वाजून ३० मिनिटे ३१ सेकंदांनी संपला. या शुभ मुहूर्तावर रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आता रामलला अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले आहेत. हे मंदिर आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

रामलला अयोध्येत स्थायिक झाले आहेत. या सोहल्यामुळे ५०० वर्षांची प्रतीक्षा आज ८४ सेकंदात संपली. या काळात देशभरात भक्ती आणि श्रद्धेचा मोठा उत्सव पाहायला मिळत आहे. अयोध्येचे वातावरण अनोखे होते, जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामाचा अभिषेक केला आणि सर्व पाहुणे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. यासोबतच १५२८ पासून सुरू असलेला रामजन्मभूमीचा संघर्षही आनंददायी वातावरणात संपला. आता जिथे एके काळी बाबरीची इमारत उभी होती तिथे भव्य राम मंदिर बांधले गेले आहे. जे आता देशभरातील आणि जगभरातील श्रद्धावंतांचे केंद्र बनणार आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील रामभक्तांमध्ये प्राणप्रतिष्ठा संदर्भात उत्साहाची लाट दिसून आली. रामललाच्या अवधपुरीतील ओग्मन केवळ श्रद्धेच्याच नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनेही युग बदलणारे मानले जात आहे.

WhatsApp channel