मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अद्भुत! रामनवमीदिवशी सूर्याच्या किरणांनी चकाकणार रामलल्ला, अनोखे डिझाईन तयार

अद्भुत! रामनवमीदिवशी सूर्याच्या किरणांनी चकाकणार रामलल्ला, अनोखे डिझाईन तयार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 22, 2024 05:40 PM IST

Ramlalla lluminated on ramnavmi : राम मंदिरात एक विशेष सूर्य तिलक तंत्र आहे. त्याचे डिझाईन असे तयार केले गेले आहे की, प्रत्येक वर्षी श्रीराम नवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूर्याची किरणे प्रभू रामच्या मूर्तीवर पडतील.

ram lalla
ram lalla

अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंदिरातील अद्भूत वास्तूकलेचा नमुना पाहायला मिळाला. अयोध्येत बनवण्यात आलेले राम मंदिर न केवळ भव्य आहे, तर यामध्ये अनेक वैशिष्ट्येही आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अयोध्या मंदिरातील अनोख्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी म्हटले की, राम मंदिरात एक विशेष सूर्य तिलक तंत्र आहे. त्याचे डिझाईन असे तयार केले गेले आहे की, प्रत्येक वर्षी श्रीराम नवमीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूर्याची किरणे प्रभू रामच्या मूर्तीवर पडतील. ही सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळावर जवळपास ६ मिनिटांपर्यंत असतील.

राम नवमी सामान्यपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात हिंदू कॅलेंडरप्रमाणे पहिल्या महिन्याच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. जा उत्सव भगवान विष्णूचे सातवे अवतार प्रभू रामाच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, बेंगळुरुमध्ये भारतीय खगोल संशोधन संस्थेने हे खास प्रकारचे डिझाइन तयार केले आहे. त्यानी म्हटले की, गियरबॉक्स आणि पारदर्शक लेंसची व्यवस्था अशा प्रकारे करण्यात आली आहे की, शिखरावरील तिसऱ्या मजल्यावरून सूर्यकिरणे थेट गर्भगृहात पडतील. 

आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मोदींनी सोनेरी रंगाचा कुर्ता, क्रीम रंगाचे धोतर परिधान केले होते. पंतप्रधान मोदी नवनिर्मित राम मंदिराच्या मुख्य द्वारातून आतमध्ये पायी चालत आले व गर्भगृहात प्रवेश केला. यावेळी पंतप्रधानांच्या हातात लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले चांदीचे छत्र दिसून आले.

WhatsApp channel