मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Lalla Idol: किती मनमोहक रुप..! प्राणप्रतिष्ठेपूर्वीच रामल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर, पाहा PHOTO

Ram Lalla Idol: किती मनमोहक रुप..! प्राणप्रतिष्ठेपूर्वीच रामल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर, पाहा PHOTO

Jan 19, 2024 07:26 PM IST

Ram Lala Idol : अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव सर्वांचे मन भरून आले आहे.

Ram Lala Idol
Ram Lala Idol

Ram Mandir Pran Pratishta : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित करण्यात येणाऱ्या रामल्लाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. मूर्तीवरून कापड हटवले गेले असले तरी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लाची विधीवत प्राण-प्रतिष्ठा झाल्यानंतर भगवंताच्या डोळ्यावरील पट्टी काढली जाईल व २३ जानेवारीपासून सामान्य लोक दर्शन घेऊ शकतील.

ट्रेंडिंग न्यूज

गुरुवारी नवनिर्मित मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान करण्यात आली. रामलल्लाची मूर्ती  विराजमान करण्यापूर्वी ४ तासा पूजा सुरू होती. मंत्रोच्चार विधी व पूजन करून भगवान रामाची मूर्ती चांदीच्या आसनावर विराजमान करण्यात आली. यावेळी मूर्तीकार योगीराज आणि अन्य संतही उपस्थित होते. 

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपनासाठी शुभ मुहूर्त सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांचा आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

अयोध्येच्या भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे. मूर्तीचे रुप सर्वांच्या मनात भरले असून मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट पाहता येत आहे. मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे जी त्याचे भव्य बालस्वरूप दर्शवते. भगवंतांच्या कपाळावर तिलक असून एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण आहे. रामललाच्या चेहऱ्यावर हलके हसू आहे आणि त्यांचे डोळे उघडे आहेत. मात्र, रामलल्लाचा हा फोटो गर्भगृहात बसण्यापूर्वीचा आहे. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा विधींना १६ जानेवारीपासून  सुरुवात झाली आहे.

WhatsApp channel
विभाग