मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १४ जोडप्यांना मिळाला बहुमान, महाराष्ट्रातील दोन जोडप्यांचा समावेश

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १४ जोडप्यांना मिळाला बहुमान, महाराष्ट्रातील दोन जोडप्यांचा समावेश

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 21, 2024 02:04 PM IST

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी तब्बल १४ जोडप्यांना पूजेचा मान दिला जाणार असून यातील राज्यातील दोघा जोडप्यांचा समावेश आहे.

Ayodhya Ram Mandir Inauguration
Ayodhya Ram Mandir Inauguration

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात उद्या दिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच विविधी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. देशात देखील विविध मंदिरे रोशनाईने उसजळून निघाली आहेत. दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतभरातून १४ जोडप्यांची यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे. यात सर्व जातींच्या जोडप्यांची निवड करण्यात आली आहे. या जोडप्यांमध्ये दलित, आदिवासी, ओबीसीसह आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दोन जोडप्यांचा देखील यात समावेश आहे.

plane crash in Afghanistan : अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना, अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती

उद्या २२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा होणार आहे. या दरम्यान देशाच्या विविध भागातून १४ जोडप्यांना यजमान म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारीला विधी सुरू झाला आणि त्याचा शनिवारी ५ वा दिवस होता. ते म्हणाले, 'हिंदू धर्मांतर्गत मंदिराच्या पूजेमध्ये अनेक विधी आहेत. अनेक अधिवास आहेत. मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजेत १४ जोडपी सहभागी होणार आहेत. हे सर्व भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि ईशान्य भागातील आहेत.

Ram Mandir : अंतराळातून इस्रोने टिपले राम मंदिराचे आकर्षक फोटो! देशी उपग्रहाची कमाल

यजमानांच्या यादीत उदयपूरचे रामचंद्र खराडी, आसामचे राम कुई जेमी, जयपूरचे गुरुचरण सिंग गिल, हरदोईचे कृष्ण मोहन, मुलतानीचे रमेश जैन, तामिळनाडूचे अदलरासन आणि महाराष्ट्राचे विठ्ठल कमनले यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील लातूर येथील घुमंटू समाज ट्रस्टचे महादेव राव, कर्नाटकातील लिंगराज बसवराज, लखनौ येथील दिलीप वाल्मिकी, डोमराजाच्या कुटुंबातील अनिल चौधरी, काशी येथील कैलाश यादव, हरियाणा येथील पलवल येथील अरुण चौधरी आणि काशी येथील कविंद्र प्रताप सिंग यांचाही यात समावेश आहे.

Delhi AIIMS : एम्सचा यू-टर्न! २२जानेवारीला अर्धा दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

'लोक कानाकोपऱ्यातून कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत'

आंबेकर म्हणाले, 'हे लोक त्यांच्या पत्नीसह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये व्यापक सहभाग राहणार असून धार्मिक ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे जोडप्यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक भागातील लोकांना राम जन्मभूमीवर मंदिर बांधायचे आहे. यासाठी अनेकांनी संघर्ष केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन यासाठी प्रचार केला. त्यामुळे प्रत्येकाला या मंदिराशी जोडायचे आहे कारण हा ऐतिहासिक क्षण आहे. हा भारताचा उत्सव आणि हिंदू समाजासाठी एकतेचा उत्सव आहे.

धार्मिक स्थळांवरून आणलेल्या पाण्याने शुद्धीकरण

शनिवारी झालेल्या विधीमध्ये देशाच्या विविध भागातून आणलेली साखर आणि फुले देवाच्या मूर्तीला अर्पण करण्यात आली. या सोहळ्यातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे देवाचे स्नान आणि देशभरातील विविध धार्मिक स्थळांवरून आणलेल्या पाण्याने गर्भगृहाचे शुद्धीकरण शनिवारी करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की १६ जानेवारीपासून सुरू झालेला हा विधी आरएसएस नेते अनिल मिश्रा आणि त्यांची पत्नी उषा मिश्रा यांच्या देखरेखीखाली होत आहे. अनिल मिश्रा हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या १५ विश्वस्तांपैकी एक आहेत. म्हैसूर येथील कारागीर अरुण योगीराज यांनी तयार केलेली रामललाची ५१ इंची मूर्ती गुरुवारी दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित करण्यात आली.

WhatsApp channel

विभाग