Ram Mandir Viral Video: अयोध्यातील राम मंदिरात दिसलं अद्भुत दृश्य, पाहून आश्चर्यचकीत झाले भक्त!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Mandir Viral Video: अयोध्यातील राम मंदिरात दिसलं अद्भुत दृश्य, पाहून आश्चर्यचकीत झाले भक्त!

Ram Mandir Viral Video: अयोध्यातील राम मंदिरात दिसलं अद्भुत दृश्य, पाहून आश्चर्यचकीत झाले भक्त!

Feb 29, 2024 07:46 PM IST

Ram Mandir Viral Video: अयोध्यातील राम मंदिरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Ram mandir
Ram mandir

Ram Temple News: देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यातील राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर हे मंदीर राम भक्तांसाठी खुले करण्यात आले. भगवान श्रीरामाच्या अभिषेकानंतर अशा अनेक गोष्टी समोर आल्या, ज्या चमत्कारापेक्षा कमी नाहीत.

सध्या सोशल मीडियावर राम मंदिरातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक पक्षी भगवान श्रीरामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. मंदिराच्या गर्भगृहात पक्ष्याचे पोहोचणे, हा एक चमत्कार मानला जात आहे. अनेकांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. लोकांचा असा विश्वास आहे की, हा पक्षी दुसरा कोणी नसून पक्ष्यांचा राजा गरुड देव आहे, जो आपल्या भगवान श्री रामाच्या दर्शनासाठी आला. लोकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.

हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. गरुड देव भगवान श्री रामललाच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा घालत असल्याचे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.

इंडिगोमध्ये भावाला नोकरी मिळताच हवाई सुंदरी बहिणीने दिले खास सरप्राइज, Video पाहून भरून येतील डोळे

यापूर्वीही राम मंदिरासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भगवान रामाची मूर्तीने हालचाल केल्याची भक्तांना जाणवले. भगवान रामाची मूर्ती बनवणारे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी स्वतः या चमत्काराला दुजोरा दिला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर मूर्तीची प्रतिमा वेगळीच होती, परंतु जेव्हा मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात करण्यात आलीस तेव्हा तिची आभा बदलली.मलाही ते जाणवलं, असेही योगीराज यांनी सांगितले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर