मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Mandir News : येत्या २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी, केंद्र सरकारची घोषणा

Ram Mandir News : येत्या २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी, केंद्र सरकारची घोषणा

Jan 18, 2024 04:02 PM IST

Half Day on 22 January in Central Govt Offices : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Ram Temple inauguration: Half-day in all central government offices on Jan 22
Ram Temple inauguration: Half-day in all central government offices on Jan 22

Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सोहळ्याच्या निमित्तानं येत्या २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालयं अर्धा दिवस बंद राहणार आहेत. 

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी ही माहिती दिली. रामभक्तांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असं सिंह यांनी सांगितलं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्तर प्रदेशात मच्छी-मटण विक्रीवरही बंदी

भाजपशासित राज्यांतील अनेक सरकारांनी २२ जानेवारीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आसाम, छत्तीसगड या राज्यांत २२ जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं मांस आणि माशांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे.

६ हजारहून अधिक मान्यवर उपस्थित राहणार

येत्या २२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सात दिवस आधी, म्हणजे १६ जानेवारीला अयोध्या मंदिर परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी दररोज विशिष्ट विधी केले जात आहेत.

Ram Katha : आजच्या पिढीने रामायणातून कोणता धडा घ्यावा, जाणूून घ्या

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-विदेशातून ६ हजारांवर मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा आमंत्रितांमध्ये समावेश आहे.

बाल कौन्सिल ऑफ इंडियाचं सरन्यायाधीशांना पत्र

बार कौन्सिल ऑफ इंडियानं बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहून २२ जानेवारीला न्यायालयाला सुट्टी देण्याची विनंती केली आहे. '२२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेला कार्यक्रम हा देशभरातील कोट्यवधी लोकांसाठी धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं महत्त्वाचा आहे, असं बार कौन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

आज गणेशपूजन व वरुण पूजन

 अयोध्येतील मंदिरात स्थापित करण्यात येणारी प्रभू रामाची मूर्ती बुधवारी रात्री मंदिर परिसरात आणली गेली. ही मूर्ती गर्भगृहाच्या आत ठेवण्यात आली आहे. विधीच्या तिसर्‍या दिवशी गुरुवारी जलविधीचा भाग म्हणून मूर्ती पाण्यानं शुद्ध करण्यात येणार असून गणेशपूजन व वरुण पूजन होणार आहे.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर