VIDEO: पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेत हिंसाचार; दगडफेक अन् वाहनांची जाळपोळ, अनेक जखमी
Ruckus during rama navami procession : हावडा येथे रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेक व जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये समाजकंठकांनी अनेक वाहने पेटवून दिली आहेत.
गुजरात राज्यातील बडोदा येथे रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेक झाल्याची तसेच मध्य प्रदेशातील इंदूर येथे राम मंदिरात दुर्घटना घडून १३ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना आता पश्चिम बंगालमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हावडा येथे रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेक व जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये समाजकंठकांनी अनेक वाहने पेटवून दिली आहेत. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हिंसाचार व जाळपोळीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचं आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. राज्यात पोलीस दलही सतर्क होते. असे असूनही हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली आहे. या गोंधळात अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीम्हटलं होतं की, रामनवमीची मिरवणूक शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लिम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका.