Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधी झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आदी उपस्थित होते.
Saamana Editorial : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
अयोध्येतील राम मंदिरात आज श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना होत आहे. त्या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, या सोहळ्याच्या निमित्तानं भाजप पुन्हा रामनामाचं राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांंच्या शिवसेनेनं केला आहे. अयोध्येच्या निमित्तानं नवं 'मोदी रामायण' सुरू असून त्याचा रामाशी व रामराज्याशी काही संबंध नाही, असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.
Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात
अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना विधीस सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित आहेत.
अयोध्येत रामलला प्रतिष्ठापणा उत्सवाचा पुण्यात जल्लोष; विविध कार्यक्रमांचे आयोजन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक व विश्व हिंदु परिषेदेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते दुपारी १२.३० सुमारास शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा हुनमान मंदिरासमोरील श्रीराम मंदिरात आरती केली जाणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला अयोध्येत पोहोचले
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानीसह अयोध्येला पोहोचले आहेत. अंबानींशिवाय आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह उद्योग जगतातील अनेक बडे उद्योगपती अयोध्येत पोहोचले आहेत.
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत झाली सुपरस्टार रजनीकांत आणि अनुपम खेर यांची भेट!
रामलल्लाच्या स्वागतासाठी आता संपूर्ण देश सज्ज झाला आहे. अयोध्येत आज दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने मनोरंजन विश्वाचे अनेक दिग्गज कलाकार देखील अयोध्येत पोहोचले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ फेम अभिनेते अनुपम खेर देखील अयोध्येत पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी अयोध्येत रजनीकांत यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीचा खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भेटीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
Ayodhya Ram Mandir: १४ लाख दिव्यांपासून साकारली श्रीरामाची प्रतिमा
अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन पोहचला आहे. दुपारी १२.२९ ला हा सोहळा सुरु होईल. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत ही पूजा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही पूजा केली जाणार आहे. आज रामलल्ला रामाच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. या निमित्त्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश दिवाळी साजरी करताना दिसत आहे. अयोध्यात फुलांची सजावट, रोषणाई करण्यात आली. तसेच रामायणाशी संबंधित विविध रांगोळ्या आणि चित्रे रेखाटण्यात येत आहेत. अशातच अयोध्येतील एका महाविद्यालयात चक्क दिव्यांपासून श्रीरामाची प्रतिमा साकारण्यात आली,ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Janakpur : श्री राम यांचे सासर जनकपूर येथेही जय्यत तयारी, या भेटवस्तू आल्या
श्री रामाच्या पत्नी सीता माता यांचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील जनकपूरमध्ये देखील या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामललाचा अभिषेक सोहळा होणार आहे. नेपाळमधील जनकपूर येथील देवी सीतेच्या जन्मस्थानावरूनही ३००० हून अधिक भेटवस्तू आल्या आहेत. श्रीलंकेच्या शिष्टमंडळाने रामायणात उल्लेख केलेल्या अशोक वाटिका या उद्यानाची खास भेट आणली आहे.
Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले, कार्यक्रम लवकरच सुरू होणार
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. राम मंदिरात लवकरच कार्यक्रम सुरू होणार आहे. ठरल्यानुसार ते सकाळी ११ वाजता मंदिरात पोहोचतील. १२.५ ते १२.५५ या कालावधीत प्राणप्रतिष्ठेशी संबंधित विधी केले जाणार आहेत.
Ram Mandir Pran Pratishtha: कुमार विश्वास यांची कविता ऐकून अभिनेते मनोज जोशी झाले भावुक!
इस्रायलकडूनही आल्या शुभेच्छा, राजदूतांनी दाखवले मंदिराचे मॉडेल
भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनी अयोध्या राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात भारतीयांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, 'राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या या शुभ प्रसंगी भारतातील जनतेला हार्दिक शुभेच्छा. जगभरातील भाविकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी लवकरच अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्यास उत्सुक आहे; माझ्याकडे असलेल्या या मॉडेलपेक्षा ते नक्कीच अधिक भव्य आणि सुंदर असेल.
Ram Mandir Pran Pratishtha: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आयोध्येला रवाना!
Ram mandir : राम मंदिर सोहळ्यासाठी गोव्यातील कॅसिनो आठ तास राहणार बंद
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी गोव्यातील सर्व कॅसिनो ८ तास बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. काही कॅसिनो चालवणाऱ्या मॅजेस्टिक प्राईड ग्रुपचे संचालक श्रीनिवास नायक यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सर्व कॅसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा सरकारने राम मंदिर अभिषेक सोहळ्यानिमित्त सोमवारी सर्व सरकारी, निमशासकीय आणि स्वायत्त संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
Ram Mandir Pran Pratishtha : परदेशातही राम मंदिर सोहळ्याच्या जल्लोष , टाइम्स स्क्वेअरवर वाटण्यात आले लाडू
केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये अयोध्येत होणारा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे. अमेरिकेतील मोठ्या शहरांपैकी न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर मोठ्या प्रमाणात भाविक जमले आहेत. टाइम्स स्क्वेअर येथे ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिराच्या सदस्यांनी या चौकात लाडू वाटल्याचे वृत्त आहे.
Ayodhya Ram mandir : राम मंदिर सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार मान्यवर राहणार उपस्थित
राम नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अयोध्येत व्हीव्हीआयपी पाहुण्यांचे आगमन रविवारपासूनच सुरू झाले आहे. अयोध्येतील या विशेष सोहळ्याला सुमारे ७००० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, 'गभाऱ्यातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मान्यवरांना दर्शन दिले जाईल,' अशी माहिती ट्रस्टने दिली आहे. ट्रस्टच्या मते, १२१ आचार्य असतील जे समारंभाच्या सर्व विधी प्रक्रियेचे समन्वय, आणि मार्गदर्शन करतील. श्री गणेशवर शास्त्री द्रविड हे सर्व प्रक्रियेचे निरीक्षण, समन्वय आणि मार्गदर्शन करतील आणि काशीचे श्री लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य आचार्य असतील.
PM Narendra Modi: अयोध्येत असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम
- सकाळी १०.२५ वाजता अयोध्या विमानतळावर आगमन
- सकाळी १०.५५ पर्यंत रामजन्मभूमी मंदिरात आगमन
- प्राणप्रतिष्ठा पूजेचा कार्यक्रम दुपारी १२.०५ पासून सुरू होईल
- शुभ वेळ (८५ सेकंद) १२.२९ मिनिटे ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद राहील.
- पूजेचा कार्यक्रम दुपारी १२.५५ पर्यंत संपेल
- दुपारी १ वाजता कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांना संबोधित करतील
- दुपारी २.०५ पर्यंत कुबेरतीला पोहोचून शिव मंदिरात पूजा.
- दुपारी ३.५ वाजता अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना होईल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राम मंदिर सोहळ्याला जाणार नाहीत, हे आहे कारण
आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना आज २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता दादर ते वडाळा शोभायात्रेतही ते सहभागी होतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे नागपुरातील एका मंदिरात आरती करणार आहेत.
Lalkrushn Advani : लालकृष्ण अडवाणी यांची सोहळ्याला अनुपस्थिती, काय कारण आहे?
उत्तर प्रदेशातील अयोध्येत पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या कार्यक्रमाला येणार नसल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, थंडी पाहता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले अडवाणी ९६ वर्षांचे आहेत.
Ram Mandir : अयोध्यानगरी राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी सज्ज
Ram Mandir : आज संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. अयोध्या येथे भव्य असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. होणार आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. आज १२ वाजून २९ मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे, मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.