morisas decler holiday for Ram Mandir : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देशातील आणखी काही राज्यांनी या दिवशी सुट्टी घोषित केली आहे. भारतासह विदेशातही राम मंदिराबाबत उत्साह आहे. मॉरिशस सरकारने २२ जानेवारी रोजी हिंदू अधिकाऱ्यांसाठी दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. जेणेकरून ते हा सोहळा पाहू शकतील. पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशस मंत्रिमंडळाने शुक्रवारी हा निर्णय घेतला.
सरकारने सांगितले की, "मंत्रिमंडळाने सोमवारी (दि २२) दुपारी २ वाजल्यापासून पुढे २ तासांसाठी विशेष सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे. भारतातील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा हा देशातील हिंदू धर्मियांसाठी मोठी घटना आहे. त्यांच्या भावनांचा आदर करून ही सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी भव्य मंदिराच्या गर्भगृहात श्री राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करणार आहेत. अयोध्येतील भव्य मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक नेते आणि समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोहळा प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारीपासून हा उत्सव सुरू होणार आहे. सात दिवस हा सोहळा चालणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने २२ जानेवारी रोजी दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लालाला प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी १६ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. अमेरिकेतील थायलंडचे राजदूत तानी संगत म्हणाले की, राम मंदिराचे उद्घाटन ही अनेक देशांतील लोकांसाठी आनंदाची बाब आहे. जसजसा हा सोहळा जवळ येत आहे, तसतसा जल्लोष सुरू आहेत. "आपली सामायिक संस्कृती आणि रामाचे घरवापसी साजरी करणे केवळ थायलंडच्याच नव्हे तर आग्नेय आशिया आणि आशिया पॅसिफिकमधील अनेक देशांतील लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे," थाई राजदूत म्हणाले.
संबंधित बातम्या