Ayodhya Ram Mandir : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जवळपास ६ हजार लोक सामील होणार आहेत. राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा समारंभाच्या आधी पंतप्रधान मोदींनी कठोर तप करण्यास सुरूवात केली आहे. मोदी सध्यायम नियमांचे पालन करत आहे. ते ११ दिवसांच्याअनुष्ठानावर आहेत. यादरम्यान मोदी जमिनीवर झोपत आहेत व केवळ नारळ पाणी पिऊन आपले काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेपूर्वी कडक उपवास केला आहे.
राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले. १२ जानेवारीपासून पंतप्रधान मोदींनी या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे दर्शन घेऊन महाआरती केली व आपला उपवास सुरू केला.
मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदी सध्या जमिनीवर झोपत आहेत. प्राण प्रतिष्ठेदिवशीही मोदींचा उपवास असणार आहे. ते विशिष्ट मंत्रांचा जप करणार आहेत. २२ जानेवारीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मुख्य यजमानाच्या भूमिकेत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित अनुष्ठानांची सुरूवात १६ जानेवारीपासून झाली आहे. हे विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील. राम मंदिर'प्राण प्रतिष्ठा'कार्यक्रम२२ जानेवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल व दुपारी एक वाजता संपेल.
पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून रामायणाशी संबंधित देशभरातील वेगेवगळ्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करत आहेत. १२ जानेवारी रोजी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती केली होती. त्यानंतर ते रामकुंड गेले होते. त्यानंतर १६ जानेवारी रोजी मोदी आंध्र प्रदेशमधील लेपाक्षी मंदिरात जाऊन वीरभद्र देवतेची पूजा-अर्चना केली होती. यावेळी त्यांनी जटायु संबंधित कथा ऐकली होती. पीएम मोदी दक्षिण भारतातील अन्य काही मंदिरातही गेले होते. बुधवारी ते केरळच्या रामास्वामी मंदिरात होते.