मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ram Mandir: ४ तासांच्या पूजेनंतर राम लल्ला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान, मूर्तीचे वजन व उंची किती?

Ram Mandir: ४ तासांच्या पूजेनंतर राम लल्ला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान, मूर्तीचे वजन व उंची किती?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 18, 2024 07:06 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिरात प्रभू रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान करण्यात आली. मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ४ तास पूजा-अर्चना केली गेली.

Ram Mandir Pran Pratishtha
Ram Mandir Pran Pratishtha

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान करण्यात आली. मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ४ तास पूजा-अर्चना केली गेली. यावेळी मूर्तिकार योगीराज आणि साधु-संत मंदिरात उपस्थित होते. मूर्ती सध्या झाकली आहे. २२ जानेवारी रोजी  प्राण प्रतिष्ठापनेनंतर मूर्ती खुली केली जाईल. रामलल्लाच्या मूर्तीचे वजन १५० ते २०० किलो दरम्यान असून उंची ५१ इंच आहे.

रामलल्ला मूर्तीचे करण्यात आले भ्रमण -
रामलल्लाची मूर्ती कार्यशाळेतून आल्यानंतर पालखीत बसवून संपूर्ण मंदिर परिसरातून फिरवण्यात आली. चांदीच्या या मूर्तीला संपूर्ण परिसराची परिक्रमा करण्यात आली. मूर्ती बुधवारी रात्री  अयोध्येत आणली गेली होती. गर्भगृहात स्थापित करण्यात येणाऱ्या मूर्तीचे वजन २०० किलो आहे. ही मूर्ती वजनदार असल्याने त्याजागी रामलल्लाची १० किलो वजनाच्या चांदीच्या मूर्तीची मंदिर परिक्रमा करण्यात आली.

शंकराचार्यांचा आक्षेप - 
दरम्यान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी म्हटले आहे की, मुख्य वेदीवर रामलल्ला विराजमानची प्राण प्रतिष्ठापना करायली हवी होती. स्वयंभू मूर्तीच्या जागी दुसऱ्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा व्हायला नको. 


२२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सात दिवस आधी,  म्हणजे १६ जानेवारीला अयोध्या मंदिर परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी दररोज विशिष्ट विधी केले जात आहेत.

WhatsApp channel