Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला गंभीर इशारा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला गंभीर इशारा

Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला गंभीर इशारा

Feb 13, 2024 04:28 PM IST

Rakesh Tikait on Farmer protest : जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आणि सरकार त्यांच्यासाठी काही समस्या निर्माण करत असेल तर ते शेतकरी आमच्यापासून दूर नाहीत आणि दिल्लीही आमच्यापासून दूर नाही, असा इशारा राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Rakesh Tikait
Rakesh Tikait

पंजाब-हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी 'दिल्लीवर मार्चा' काढला आहे. यावर भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आपले मौन सोडले आहे. राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन करताना म्हणले की, आंदोलनाचा निर्णय योग्य आहे. त्यांनी केंद्र सरकारने इशारा देताना म्हटले की, जर या शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर माझ्यासाठी दिल्ली दूर नाही.

भारतीय किसान युनियन (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी म्हटले की, देशात मोठ्या भांडवलदार कंपन्या आहेत, ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी हा देश ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत समस्या निर्माण होतील. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आणि सरकार त्यांच्यासाठी काही समस्या निर्माण करत असेल तर ते शेतकरी आमच्यापासून दूर नाहीत आणि दिल्लीही आमच्यापासून दूर नाही.

दिल्लीवर मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये भारतीय किसान युनियन सहभागी नाही. याबाबत राकेश टिकैत यांनी सांगितले की, मोर्चा काढलेल्या संघटनांनी पूर्वीच्या आंदोलनात स्वत:ला दूर ठेवले होते. यापैकी एकाही संघटनेने आमच्याशी संपर्कही साधला नाही. सर्वजण आपापल्या परीने कार्यक्रम करत आहेत.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जे काही उपाय करत आहे, ते चुकीचं आहे. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी. चर्चेने प्रश्न सोडवला पाहिजे. सरकारने रस्त्यावर खिळे वगैरे वापरू नयेत. शेतकरी संघटनांकडून १६ फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंद आहे. त्यांना काही अडचण आली तर आम्हीही सक्रिय होऊ. शेतकऱ्यांना काही समस्या असेल तर आम्ही दिल्लीकडेकूच करू. देशात अनेक संघटना आहेत. शेतकरी सीमेवर थांबवले जाऊ नये. त्यांना येऊ द्या. प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर