लोकसभा निवडणुकीपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपच्या सर्व ८ उमेदवारांनी राज्यसभेचे मैदान मारले आहे. यूपीमधील १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्याने मतदान केले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाच्या आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.
उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एकूण १० जागांसाठी मतदान झाले. यामध्ये भाजपचे अमरपाल मौर्या, तेजवीर सिंह, आरपीएन सिंह, साधना सिंह, सुधांशु त्रिवेदी, संगीता बलवंत आणि संजय सेठ यांनी विजय मिळवला आहे. तर समाजवादी पार्टीकडून रामजी लाल सुमन आणि जया बच्चन यांनी निवडणूक जिंकली आहे.
या १० जागांसाठी ३९९ पैकी ३९५ मतदारांनी मतदान केले. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्या पत्नी महाराजी देवी मतदानासाठी आल्या नाहीत. तसेच, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केले.
यूपीमधील १० राज्यसभा जागांसाठी ७ जागांवर भाजप व ३ जागांवर सपचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र भाजपने शेवटच्या क्षणी संजय सेठ यांच्या रुपात आपला आठवा उमेदवार दिला. निवडणुकीपूर्वी सप प्रमुख अखिलेश यादव यांनी आमदारांना डिनर साठी बोलावले होते. त्यासाठी पक्षाचे सात आमदार अनुपस्थित राहिले होते. तेव्हापासून क्रॉस वोटिंगची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर भाजपच्या संजय सेठ यांनी आलोक रंजन यांचा पराभव केला.
संबंधित बातम्या