पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७१ मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडला.
मोदी ३.० मधील या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. ऑक्टोबर २००१ ते मे २०१४ या कालावधीत गुजरातमध्ये पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात आज अनेक राज्यातील तब्बल ६ माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.
राजनाथ सिंह : पंतप्रधानांनंतर दुसऱ्या क्रमाकांवर शपथ घेतलेले राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत. लखनौ लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते पहिल्या मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री होते आणि दुसऱ्या आणि आधीच्या मंत्रिमंडळात संरक्षण खाते सांभाळले होते.
शिवराज सिंह चौहान - ’मामा' म्हणून ओळखले जाणारे शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असून विदिशा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत.
मनोहर लाल खट्टर : हरियाणातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री खट्टर यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या महिन्यांत मार्चमध्ये राजीनामा दिला आणि पक्षाचे सहकारी नायब सिंह सैनी यांचा मार्ग मोकळा झाला. कर्नाल ची जागा त्यांनी जिंकली.
सर्वानंद सोनोवाल : आसामचे पहिले भाजप मुख्यमंत्री सोनोवाल यांनी 2021 मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांना संधी दिली. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय देण्यात आले.
एचडी कुमारस्वामी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे वडील एचडी देवेगौडा हे माजी पंतप्रधान आहेत.
जीतम राम मांझी : बिहारचे माजी मुख्यमंत्री गया मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०२४ मध्ये लोकसभेला पराभव झाल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची राजीनामा देत राज्याची सुत्रे जीतम राम मांझी यांच्याकडे सोपवली होती.
कर्नाटक आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि बिप्लब देब यांनीही लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आलेले नाही.
संबंधित बातम्या