Sachore Suicide: राजस्थानच्या सांचोर जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुथडी गावात एका महिलेचे दिरावर प्रेम जडले. यानंतर दोघांचेही मृतदेह गावातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सरवना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याची पोलीस चौकशीत उघड झाले. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मेवाराम नेवासी (वय, ३८) आणि चेतना देवी (वय, २८) यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, शनिवारी पहाटे दोघांचा मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघांचा मृतदेह खाली उतरवला. यानंतर पोलिसांनी दोघांचा मृतदेह सुथडी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील घिवली या गावात आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. तिसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून एका महिलेने पोटच्या पाच दिवसांच्या मुलीची हत्या केली. यानंतर निर्दयी महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकला. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली.
संबंधित बातम्या