Rajasthan Minister Babulal Kharadi Statement : राजस्थानचे नवे आदिवासी प्रादेशिक विकास मंत्री बाबूलाल खराडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त व्यक्तव्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आहेत. खराडी म्हणाले, तुम्ही भरपूर मुलांना जन्म द्या. मोदीजी तुम्हाला घरे बांधून देतील. मग काय अडचण आहे ? असा प्रश्न विचारताच उपस्थितात हशा जरी पिकला असला तरी, त्यांच्या या व्यक्तव्यामुळे खराडी यांचावर टीका होत आहे.
बाबुलाल खराडी हे उदयपूर शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नई गावात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. दोन बायका असलेले बाबूलाल खराडी हे एकमेव मंत्री आहेत. त्यांनी आदिवासी परंपरेनुसार दोनदा लग्न केले आहे. खराडी यांनी उदयपूर येथील विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमात मंत्री बाबुलाल खराडी यांच्यासह स्थानिक आमदार आणि भाजप नेतेही सहभागी झाले होते. मात्र, या कार्यक्रमात त्यांनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मिडियामद्धे व्हायरल देखील होत आहे.
लोकांशी बोलतांना बाबूलाल खराडी म्हणाले की, तुम्ही अनेक मुलांना जन्म द्या. पंतप्रधान त्यांच्यासाठी घरे बांधतील. त्यांच्या या व्यक्तव्यावरून उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या, मात्र, आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. हा कार्यक्रम उदयपूर शहराजवळील नई गावातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात सूर होता. विकास भारत संकल्प यात्रेच्या शिबिरात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील उपस्थित होते. त्यांच्या समोरच त्यांनी हे वादग्रस्त व्यक्तव्य केले. बाबूलाल खराडी हे राज्याचे आदिवासी मंत्री आहेत. बाबूलाल खराडी हे उदयपूर जिल्ह्यातील झाडोल विधानसभेचे आमदार आहेत.
उज्ज्वला योजना आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ४५० रुपयांना मिळणारे सिलिंडर वरुन खराडी म्हणाले, “अजूनही काही गोष्टी महाग आहेत तर काही गोष्टी स्वस्त करायच्या आहेत. रस्ते, विद्युत या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वच गोष्टी फुकट देता येणार नाही. भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे की कोणीही उपाशी झोपू नये. एक तर अनेक नागरिकांना घरे नाहीत. पंतप्रधान आपले आहेत. आम्ही घर बांधू. मग काय अडचण आहे. तुम्हाला माहिती आहे की भारताच्या पंतप्रधानांना देशाला महासत्ता बनवायचे आहे. या साठी युवशक्ति गरजेची आहे.