Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

Jodhpur Black Magic: घरगुती वादातून मुक्तता मिळविण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधला, आयुष्यभराची कमाई झटक्यात गमावली!

May 21, 2024 08:20 PM IST

Jodhpur Black Magic Fraud: राजस्थान येथील जोधपूरमध्ये काळ्या जादूच्या नावाखाली एका शिक्षकाची फसवणूक करण्यात आली.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये काळ्या जादूच्या नावाखाली शिक्षकाची फसवणूक करण्यात आली.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये काळ्या जादूच्या नावाखाली शिक्षकाची फसवणूक करण्यात आली.

Black Magic News: राजस्थानच्या जोधपूरमध्ये घरगुती त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी तांत्रिकाशी संपर्क साधलेल्या शिक्षकाला आपल्या दोन मालमत्ता गमवाव्या लागल्या. हा प्रकार शिक्षकाच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

चेतनराम देवडा यांची पत्नी सुषमा देवडा यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कालू खान नावाचा तांत्रिक आणि त्याचा मुलगा अब्दुल कादिर यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, चेतनराम देवडा आणि कालू खान एकाच परिसरात राहतात. काळ्या जादू द्वारे उपाय करत असल्याचा दावा करणाऱ्या तांत्रिकाने आपल्या मुलासह चेतनरामला पटवून दिले. यानंतर घरगुती वादातून मुक्तता मिळवण्यासाठी चेतनराम देवडाने कालू खानकडे मदत मागितली. त्यावेळी कालू खानने चेतनराम देवडाला त्याची मालमत्ता हेच त्याच्या समस्यांचे मूळ असल्याचे सांगितले. कालू खानने चेतनराम देवडाला ४ हजार चौरस फुटांच्या मालमत्तेची मालकी हस्तांतरित करण्यास राजी केले. तसेच समस्यांचे निराकरण झाल्यानंतर ते परत करण्याचे आश्वासन दिले. हा प्रकार २०२३ मध्ये जुलै महिन्यात घडला.

मालमत्तेची मालकी हस्तांतरित केल्यानंतरही चेतनराम देवडा यांच्या घरात वाद सुरूच होता. यामुळे चेतनरामने कालू खान आणि अब्दुल कादिर यांच्याकडे पुन्हा संपर्क साधून मालमत्ता परत करण्याची विनंती केली. मात्र, कालू खान आणि त्याच्या मुलाने ही मालमत्ता पूर्ववत केल्यास कौटुंबिक मृत्यू होईल, अशी भिती दाखवली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कालू खानने चेतनराम देवडा जवळी अतिरिक्त १२०० चौरस फूट मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले.

घरगुती वाद कायम राहिल्यावर चेतनरामने कालू खान आणि अब्दुल कादिर यांच्याकडे पुन्हा संपर्क साधून मालमत्ता परत करण्याची विनंती केली. त्यानंतर या दोघांनी असा दावा केला की हस्तांतरण पूर्ववत केल्यास कौटुंबिक मृत्यू होईल. त्यामुळे त्यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये अतिरिक्त १२०० चौरस फूट मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यास पुन्हा पटवून दिले. यानंतर आरोपीने दोन्ही मालमत्ता बिरबल आणि राम किशोर यांना विकल्या. बिरबल आणि राम किशोर यांनी मालमत्तेवर दावा करण्यासाठी देवडा यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सुषमा देवडा यांनी चार जणांविरुद्ध मालमत्ता हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर