मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajasthan: खळबळजनक ! दलित विद्यार्थिनीने मडक्याला हात लावल्याने शिक्षकाने केली मारहाण; उपचारा दरम्यान मृत्यू

Rajasthan: खळबळजनक ! दलित विद्यार्थिनीने मडक्याला हात लावल्याने शिक्षकाने केली मारहाण; उपचारा दरम्यान मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 14, 2022 12:51 AM IST

राजस्थान येथील जालौर जिल्ह्यात एका दलित विद्यार्थिनीने मडक्याला हात लावल्याने एका शिक्षकाने तिला जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या कानाचा पडदा फाटला. अहमदाबाद येथे उपचार सुरू असतांना या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

crime
crime

राजस्थान येथे एका दलित विद्यार्थिनीला मडक्याला हात लावणे जिवावर बेतले आहे. मडक्याला हात लावल्याने शिक्षकाने तिला जबर मारहाण केली. यात ती जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना राजस्थान येथील जालौर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. ही मुलगी मारहाणीत जखमी झाली होती. तिच्या कानाचा पडदा फाटल्याने तिला अहमदाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी जालोर जिल्ह्याच्या सायला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना २० जुलै रोजी घडली. इंद्र मेघवाल असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाणी पिण्यासाठी वर्गातील मडक्या जवळ गेली. त्याला हात लावला. तिच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे की, तिने मडक्याला हात लावल्या नंतर शिक्षक छैल सिंह याने तिला जबर मारहाण केली. यामुळे तिच्या कानाचा पडदा फाटला. यामुळे ती गंभीर झाल्याने तिला अहमदाबाद रुग्णालयात भरती करण्यात आले. या ठिकाणी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री गहलोत यांनी व्यक्त केले दुख:

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या मुलीच्या मृत्यू प्रकरणी दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटळे आहे की, जालौर येथील जायला पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील एका शाळेत शिक्षकाच्या मारहाणीत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आरोपी शिक्षका विरोधात एससी-एसटी एक्ट नुसासर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही केस वेगाने चालवली जाणार असून पीड़ित मुलीच्या परिवाराला याप्रक्ररणी न्याय दिला जाणार आहे. मुलीच्या परिवाराला शासनातर्फे ५ लाख रुपये मदत म्हणून मुख्यमंत्री मदत निधीतून दिली जाणार आहे.

या प्रकरणी जालोरचे एस. पी. हर्षवर्धन अग्रवाल म्हणाले, या प्रकरणी खून आणि एससी-एसटी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मडक्याला हात लावल्याने मारहाण करण्यात आली या गोष्टीची खात्री झालेली नाही. शाळेतील अन्य शिक्षक जे मागासवर्गीय आहेत त्यांनी या बाबत माहिती दिली आहे. या शाळेत पाण्याची एक टाकी आहे. ज्याला नळ लावण्यात आला आहे. या नळाद्वारे सर्व पाणी पित असतात. जालौर पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी सायला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपास सुरू आहे. आरोपी शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग