जयपूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जयपूरच्या विश्वकर्मा परिसरात एका बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने एका लहान मुलासह तीन जण बुडाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, इमारतीच्या बेसमेंटमध्ये दोन कुटूंब रहात होते. माहिती मिळताच सिविल डिफेंसचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी तीन लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजल्यापासून बेसमेंटमधील पाणी काढण्याचे काम सुरू होते. मुसळधार पावसाने बगरू पोलीस ठाणे परिसरात एक नाल्यात १२ वर्षीय चिमुकला वाहून गेला.
दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगर भागात एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरलं होतं. अनेक विद्यार्थी या तळघरात अडकले होते. त्यापैकी दोन तरुणी व एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे प्रकरण ताजं असतानाच जयपूरमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या तळघरातील पाणी काढण्याचं काम चालू आहे.
जयपूरमधील विश्वकर्मा भागात पावसाचं पाणी एका तळघरात शिरलं. या तळघरात चार वर्षांच्या चिमुरडीसह ३ जण अडकले होते. या तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचं बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून तळघरातील पाणी काढण्याचं काम सुरू केलं आहे.
मुसळधार पावसामुळे जयपूरच्या अनेक भागांमध्ये घरं कोसळल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. तर काही भागात रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. जयपूरच्या जामडोली परिसरात मुलांना घेऊन जाणारी एक स्कूल बस आणि व्हॅन रस्ता खचल्याने अडकून पडल्या. याचे फोटोही समोर आले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व मुलांना गाडीतून सुखरुप खाली उतरवले गेले. रस्त्यात रुतून बसलेल्या गाड्या काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आले.
जयपूरमध्ये मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाली. जयपूर जंक्शन, गांधी नगर स्टेशनवर पावसाचे पाणी जमा झाले. ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे रेल्वे सेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवासी स्टेशनवरच अडकून पडले आहेत. गांधीनगर रेल्वे स्टेशनवर रेल्वे ट्रॅकवर पाणी भरले आहे. सीकरमध्येही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत.
संबंधित बातम्या