मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime news : संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पत्नीला केलं ठार

Crime news : संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पत्नीला केलं ठार

May 23, 2024 08:42 PM IST

Rajasthan News : आरोपीने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेच्या अंगावरील जखमा पाहून डॉक्टरांनी पोलिसांना बोलावला. पोलीस घटनास्थळी दाखल होताच, हत्येचा उलगडा झाला.

खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पत्नीला केलं ठार
खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पत्नीला केलं ठार

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत तिला ठार केलं. कारण त्याला संशय होता की, पत्नीने त्याच्या वडिलांच्या खिशातून पैसे काढून घेतले होते. आरोपीने बेदम मारहाण करत आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी हत्येला रस्ते अपघाताचे रुप देण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेच्या अंगावरील जखमा पाहून डॉक्टरांनी पोलिसांना बोलावला. पोलीस घटनास्थळी दाखल होताच, हत्येचा उलगडा झाला.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी सांगितले की, ही घटनापाली शहराच्या टीपी नगरपोलीस ठाणे क्षेत्रातील सुंदर नगर विस्तार कॉलनीमधील आहे. येथे आरोपी दिलीप नेत्याची पत्नी यशोदा (वय २८) हिची बेदम मारहाण करून हत्या केली. आरोपी दिलीपचे वडील गिरधारी लाल यांच्या खिशातून पैसे गायब झाले होते. याबाबत गिरधारी यांनी आपला मुलगा दिलीपकडे तक्रार केल्यानंतर दिलीपला आपल्या पत्नीवर संशय आला. त्यांनी पत्नीला खोलीत बंद करून तिच्याकडे चौकशी केली. मात्र पैसे न मिळाल्याने रागाच्या भरात त्याने पत्नीला लाथा-बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला.

पत्नीला मारल्यानंतर आरोपी दिलीपनेरक्त लागलेले कपडे बदलले. महिलेला आपल्या कारमध्ये घालून रुग्णालयात घेऊन गेला. तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. मृत महिला यशोदा हिची आई शांता यांच्या तक्रारीनुसार सासू रूपाली, सासरे गिरधारी लाल, दीर गोपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नातेवाईकांकडून अपघाताचा बनाव -

अतिरिक्त पोलीस अधीक्षक विपिन शर्मा यांनी सांगितले की, चावडिया हिंमतनगर, गुजरात निवासी चेनाराम प्रजापत यांची मुलगी यशोदा हिचा विवाह ९ वर्षापूर्वी लांबिया गावातील दिलीप प्रजापत याच्याशी झाला होता. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आरोपी दिलीप बेंगळुरूमध्य राहते. तेथे स्टीलचे रेलिंग बनवण्याचे काम करतो. स्कूलला सुट्ट्या असल्याने महिला मुलांना घेऊन सासरी आली होती. सासरच्या लोकांनी हा अपघात असल्याचे सांगितले होते, मात्र संपूर्ण शरीरावर मारहाणीचे निशाण असल्याने डॉक्टरांना संशय आला व त्यांनी पोलिसांना सूचना दिली.

आरोपी पती आपल्या पत्नीला घेऊन रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांना दिसले की, महिलेचे डोळे सुजले होते, डोक्यातून रक्त येत होते. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कसून चौकशी केली असता त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी सांगितले की, दिलीपचा यशोदाशी २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना २ मुलेही आहेत. मृत महिला १३ दिवसापूर्वीच आपल्या माहेरहून सासरी आली होती. पोलिसांनी आरोपी पती दिलीप प्रजापत याच्यासह कुटूंबातील सर्व सदस्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

 

आरोपी दिलीपने पत्नीला इतकी मारहाण केली की, तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कुटूंबात खळबळ माजली. त्यांना ही हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रुग्णालयात नेऊन डॉक्टरांना सांगितले की, रस्ते अपघातात यशोदा जखमी झाली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग