पती की हैवान..! पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून संपूर्ण गावातून फरफटत नेले, कारण ऐकून व्हाल थक्क-rajasthan man ties wife to motorcycle drags her around village arrested ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पती की हैवान..! पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून संपूर्ण गावातून फरफटत नेले, कारण ऐकून व्हाल थक्क

पती की हैवान..! पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून संपूर्ण गावातून फरफटत नेले, कारण ऐकून व्हाल थक्क

Aug 14, 2024 12:38 AM IST

Rajasthan : पत्नीला मोटारसायकलच्या मागे दोरीने बांधून संपूर्ण गावातून फरपटत नेणाऱ्या पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

 पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून संपूर्ण गावातून फरफटत नेले
 पत्नीला मोटरसायकलच्या मागे बांधून संपूर्ण गावातून फरफटत नेले

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील खींवसर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने क्रुरतेची सर्व मर्यादा ओलांडत आपल्या पत्नीवर असा अत्याचार केला ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. आरोपी पतीने आपल्या पत्नीला मोटारसायकलीच्या मागे दोरीने बांधले व तिला रस्त्यावरून फरफटत नेले. आरोपीने संपूर्ण गावातून पत्नीला ओढत नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही की, एक पती अर्धांगिनीसोबत असे कृत्य करू शकतो. 

पत्नीला मोटारसायकलने बांधून गावात खेचून नेणाऱ्या पतीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात महिलेला मोटारसायकलला बांधून मागे खेचले जात असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने महिलेला गाडीला बांधण्यापूर्वी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

पंचौडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, ही घटना सुमारे महिनाभरापूर्वी नाहरसिंगपुरा गावात घडली होती. प्रेमराम मेघवाल (३२) याने पत्नीला मारहाण करून मोटारसायकलला बांधून पाठीमागे ओढत नेेले.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल -

महिनाभरापूर्वीची ही घटना असताना सोमवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही महिला सध्या आपल्या नातेवाइकांकडे राहत असून या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. या गुन्ह्याचा व्हिडिओ हाती आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

आरोपीला सोमवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेघवाल हा मद्यपी असून तो पत्नीला नेहमी मारहाण करत असे, असे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. तसेच गावातील कोणाशीही तिला बोलू दिले जात  नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीसोबत जनावरासारखे वर्तन -

व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे. ही घटना नागौर जिल्ह्यातील खींवसर उपखंडातील पाचौडी गावातील आहे. समोर आलेल्या व्हिडिओत दिसते की, आरोपी गतीने बाईक चालवून महिलेला फरपटत नेत आहे. महिला वेदनेने ओरडत आहे, मदतीची याचना करत आहे. मात्र तिच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही. सर्वांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसले.

पत्नीला मोटारसायकलीच्या मागे बांधून ओढले -

आरोपी प्रेम राम मेघवाल याचा विवाह १० महिन्यापूर्वी झाला होता. मात्र तो पत्नीला नियमित मारहाण करत होता. त्यांनी पत्नी एक महिन्याआधी आपल्या बहिणीच्या घरी बाडमेरला जाण्याचा हट्ट करत होती. पतीने नकार दिल्यानंतरही ती गेली  होती. यामुळे नाराज झालेल्या मेघवालने तिला मोटरसायकलच्या मागे बांधून संपूर्ण गावातून फरफटत, घसटत नेले. विशेष म्हणजे आसपासच्या लोकांनी या घटनेचा विरोध केला नाही. लोक या घटनेचा व्हिडिओ बनवू लागले.

राजस्थानमधील महिलांवरील गुन्हे सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत. महिलांवरील गुन्ह्यांच्या आकडेवारीत सध्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एनसीआरबीने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये उत्तर प्रदेश (६५,७४३) मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक एफआयआर नोंदवले गेले, त्याखालोखाल महाराष्ट्र (४५,३३१), राजस्थान (४५,०५८), पश्चिम बंगाल (३४,७३८) आणि मध्य प्रदेश (३२,७६५) यांचा क्रमांक लागतो.

 

विभाग