Rajasthan Murder: राजस्थानच्या बारन जिल्ह्यात गुरुवारी (७ मार्च २०२४) धक्कादायक घटना घडली. ओरल सेक्सला नकार दिला म्हणून मित्राची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात टाकला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. यातील eएका आरोपीने अटकेच्या भितीने विष प्राशन केले. त्याच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओमप्रकाश बैरवा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, मुरलीधर प्रजापती आणि सुरेंद्र यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बारनचे पोलीस अधीक्षक राज कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी ओमप्रकाश बैरवा याचा मृतदेह बारण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कोरड्या तलावात आढळला. हत्येच्या दिवशी मयत आणि दोन्ही आरोपी एकत्र दारू प्यायले. त्यानंतर प्रजापतीच्या बहिणीला भेटण्यासाठी जवळच्या गावात गेले. परत येताना प्रजापती आणि यादव यांनी त्यांच्यासोबत ओरल सेक्स करण्यास नकार दिल्याने बैरवाला मारहाण केली. या घटनेत बैरवाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी प्रजापती आणि यादव यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत प्रजापतीने हत्येची कबुली दिली. प्रजापती हा रस्त्याच्या कडेला ढाबा चालवत होता. तर, दुसरा आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा आहे, असे बारण शहर पोलीस ठाण्याचे एसएचओ रामविलास यांनी सांगितले.