Rajasthan Murder news: राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून संपूर्ण देशाला हादरून टाकणारी माहिती समोर आली. एका तरुणाने आपली आई आणि बहिणीची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याने परिसरात एकच खळबळ माजली. हत्येमागचे कारण अस्पष्ट असून या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणी देवी (वय, ५५) आणि त्यांची मुलगी कविता (वय, ३०) आणि मोठा भाऊ सुरेश यांच्याशी महिलेचा धाकटा मुलगा रमेशने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुरुवारी रमेश यांनी शेतात रक्ताचे डाग असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जेसीबीने सात फूट खड्डा खोदून पाणी देवी आणि कविताचा मृतदेह बाहेर काढले.
दरम्यान, पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. मोठा भाऊ सुरेश यांनीच आई आणि बहिणीची हत्या केली, असा संशय व्यक्त करत रमेशने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंगळवारी एका महिलेने तीन मुलींची हत्या करून स्वत: आत्महत्या केली. सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला वैतागून महिलेने धक्कादायक पाऊल उचलले. संजीता (वय २८) मुलगी आराध्या (५ वर्ष), सृष्टि (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.