Mahashivratri : महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना, विजेचा शॉक लागून १४ मुले गंभीररित्या भाजली-rajasthan kota several children were electrocuted during procession on the occasion of mahashivratri ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mahashivratri : महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना, विजेचा शॉक लागून १४ मुले गंभीररित्या भाजली

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना, विजेचा शॉक लागून १४ मुले गंभीररित्या भाजली

Mar 08, 2024 03:32 PM IST

Kota Mahashivratri News : महाशिवरात्री निमित्त निघालेल्याएका मिरवणुकीवेळी अनेक मुलांना विजेचा धक्का लागला. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना कोटा येथे घडली.

महाशिवरात्री मिरवणुकीत मोठी दुर्घटना
महाशिवरात्री मिरवणुकीत मोठी दुर्घटना

राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्री दिवशीच मोठी दुर्घटना घडली आहे. महाशिवरात्री निमित्त निघालेल्या एका मिरवणुकीवेळी अनेक मुलांना विजेचा धक्का लागला. मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, ऊर्जा मंत्री हिरालाल नागर  यांच्यासह पोलीस व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ घडली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठले.  जखमी मुलांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा ७० टक्के, तर दुसरा ५० टक्के भाजला आहे. उर्वरित मुले १० ते १५ टक्के भाजली आहेत. जखमीं मुलांचे वय ९ ते १६ वर्षाच्या दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

राजस्थानमधील कोटा येथे कुन्हाडी थर्मल चौकातून जात असलेल्या महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा करंट लागल्याने एक डझनहून अधिक मुले जखमी झाली. सर्व मुलांचे हात-पाय भाजले आहेत. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले गेले. 

हा अपघात थर्मल पावर प्लांटच्या जवळ काली वस्ती येथे झाला. महाशिवरात्रीनिमित्त  शिव शोभायात्रा काढली होती. यामध्ये मोठ्या संख्येने लहान मुले सहभागी झाली होती. मुलांच्या हातात झेंडा होता. मिरवणुकीत एक झेंडा वरून गेलेल्या हायटेंशन लाइनला स्पर्श झाला. यानंतर झेंडाच्या रॉडमधून विद्युत प्रवाह उतरला. कोटाच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहन यांनी सांगितले की, काली बस्तीचे लोक कलश भरण्यासाठी एकत्रित जमले होते. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता. यावेळी एका मुलाच्या हातात लांब लोखंडी पाईप होती. याचा स्पर्श उच्चवाहिनी तारेला झाला. यामुळे त्या मुलाला करंट लागला. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या अन्य मुलांनाही विजेचा धक्का लागला.