मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वत: विवस्त्र होणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाचा निर्णय

मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वत: विवस्त्र होणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाचा निर्णय

Jun 21, 2024 02:50 PM IST

High Court : अल्पवयीन मुलीचे अंडरवेअर काढणे व स्वत:नग्न होणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न मानता येणार नाही. असा महत्वपूर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयासाठी बलात्काराचा प्रयत्न गुन्ह्याची व्याख्या स्पष्ट
न्यायालयासाठी बलात्काराचा प्रयत्न गुन्ह्याची व्याख्या स्पष्ट

राजस्थान हायकोर्टाने एका महत्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीचे अंडरवेअर काढणे व स्वत: नग्न होणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न मानता येणार नाही. न्यायालयाने ३३ वर्षे जुन्या प्रकरणात निकाल देताना म्हटले की, अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे व स्वत:ही विवस्र होणे एक वेगळ्या अपराध श्रेणीत येते. ही कृती महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा मानला जाईल. कोर्टाने म्हटले की, एखाद्या मुलीचे अंतर्वस्त्र काढणे व नग्न होणे आयपीसी कलम ३७६ आणि ५११ नुसार गुन्हा मानता येणार नाही.


जस्टिस अनूप कुमार ढांड यांच्या एकल सदस्यीय पीठाने म्हटले की, हा बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मानता येणार नाही. बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा म्हणजे आरोपीने तयारीच्या पुढच्या टप्प्यात काम करणे. मुलीचे अंडरवेअर काढणे आयपीसी कलम ३५४ नुसार गुन्हा आहे. 

न्यायाधीशांनी म्हटले की, आयपीसी कलम ३७६/५११ नुसार गुन्ह्यासाठी कोणताही पुरावा नाही. आरोपीला याचिकाकर्तीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येणार नाही. हा गुन्हा भादंसं ३५४ च्या कक्षेत येतो. कारण आरोपी तयारीच्या पुढच्या टप्प्यापर्यंत गेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज


महिलेने टोंक जिल्ह्यातील टोडारायसिंह मध्ये पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार ९ मार्च, १९९१ रोजी त्यांची ६ वर्षाची नात पाणपोईवर पाणी पीत होती. त्यावेळी आरोपी सुवालाल तेथे आला व बलात्कार करण्याच्या उद्देश्याने तो तिला जवळच्या धर्मशाळेत घेऊन गेला. ही घचाना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलिस तक्रारीत म्हटले होते की, जेव्हा मुलीने आरडाओरडा केला तेव्हा गावातील लोक तेथे पोहोचले व मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले. जर लोक वेळेवर पोहोचले नसते तर त्याने तिच्यावर बलात्कर केला असता. 

दोन प्रकरणाचा दिला हवाला -
फैसला सुनावताना जस्टिस ढांड यांनी अन्य काही प्रकरणांचा हवाला दिला. न्यायाधीशांनी दामोदर बेहरा विरुद्ध ओडिशा आणि सिट्टू विरुद्ध राजस्थान राज्य यासारख्या प्रकरणांचा हवाला दिला. यामध्ये आरोपीने एका मुलीला जबरदस्तीने नग्न केले आणि तिचा विरोध असतानाही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही प्रकरणात आरोपींच्या कृत्यांना बलात्काराचा प्रयत्न मानले गेले होते.

कोणता गुन्हा मानला जाणार बलात्काराचा प्रयत्न?
न्यायालयानुसार बलात्काराचा प्रयत्न गुन्ह्यासाठी तीन टप्पे पार करणे आवश्यक आहे. पहिला टप्पा रोपी गुन्हा करण्याचा विचार व उद्देश ठेवतो. दूसऱ्या टप्प्यात आरोपी बलात्कार करण्याची तयारी करतो. तिसरा टप्पा आरोपी बलात्कार करण्यासाठी पुढचे पाऊल उचलतो. बलात्काराचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यासाठी याचिकाकर्त्यांना सिद्ध करावे लागेल की, आरोपी तयारीच्या पुढच्या टप्प्यात गेला होता.

सत्र न्यायालयाचा आदेश हायकोर्टाने बदलला –

पीडिता आणि अभियोजन पक्षाकडून असा कोणताही आरोप लावला नव्हता की, आरोपीने पेनिट्रेशनचा प्रयत्न केला होता. टोंक जिल्हा न्यायालयाने आरोपी सुवालाल याला बलात्काराच्या प्रयत्नात दोषी ठरवले होते. आरोपी खटल्याच्या दरम्यान अडीच महिने जेलमध्ये होता. न्यायालयाने आरोपीवर लावलेली ३७६ व ५११ कलमे काढून टाकले, या कलमानुसार ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. राजस्थान हायकोर्टाने आरोपीवर लावलेले ३७६ व ५११ कलमे ३५४ मध्ये बदलली.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर