११ वर्षांची बलात्कार पीडिता मुलाला देणार जन्म! हाय कोर्टाने गर्भपाताची परवानगी नाकारली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ११ वर्षांची बलात्कार पीडिता मुलाला देणार जन्म! हाय कोर्टाने गर्भपाताची परवानगी नाकारली

११ वर्षांची बलात्कार पीडिता मुलाला देणार जन्म! हाय कोर्टाने गर्भपाताची परवानगी नाकारली

Jan 20, 2024 12:11 PM IST

rajasthan high court : अल्पवयी मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आले होते. या मुलीने गर्भपाताची परवानगी मागितली होती. मात्र, राजस्थान हायकोर्टाने ही परवानगी नाकारली आहे.

rape victim
rape victim

rajasthan high court rejects 11 year old rape survivor mtp plea for abortion : बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या ११ वर्षाच्या मुलीला आता तिला मुल जन्माला घालावे लागणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने मुलीला गर्भपात करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी मुलीची याचिका फेटाळताना आपल्या निर्णयात म्हटले आहे की, "पूर्ण विकसित गर्भालाही जगण्याचा, या जगात येण्याचा आणि निरोगी जीवन जगण्याचा अधिकार आहे."

manoj jarange patil : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही; मराठा आरक्षणाबाबत जरांगे-पाटील भावुक, आंदोलक मुंबईला रवाना

राजस्थान येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. यातुन ती गर्भवती राहिली होती. ती ३१ आठवड्यांची गरोदर राहिली. दरम्यान, यामुळे तिच्यावर झालेल्या आत्याचाराची तिला आठवण होत असल्याने तिने गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाला मागितली होती. मात्र, ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता तिला या मुलाला जन्म द्यावाच लागणार आहे.

एका वर्तमान पत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीनुसार न्यायमूर्ती अनुप कुमार धांड म्हणाले की, वैद्यकीय मंडळाच्या सल्ल्यानुसार, गर्भाचे वजन वाढत आहे आणि त्याचे सर्व महत्वाचे अवयव पूर्ण विकसित झाले आहेत.

Republic Day 2024: या प्रजासत्ताक दिनी, मुलांना २६ जानेवारीचे महत्त्व या प्रकारे शिकवा!

न्यायमूर्ती धांड म्हणाले, मूल आता जन्माला आले आहे, त्यामुळे गर्भपाताला परवानगी देता येणार नाही. ते म्हणाले की अशाच दोन प्रकरणांवर सुनावणी करताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेही गर्भपाताची परवानगी नाकारली होती.

वैद्यकीय मंडळानेही गर्भपात मुलीसाठी सुरक्षित नसून त्यामुळे तिचा जीव धोक्यात येऊ शकतो, असा अभिप्राय दिला असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बलात्कारातून ती गर्भवती राहिली असल्याने तिला गर्भपात करायचा आहे. हे मुल जन्माला आले तर तिला तिच्यावर झालेल्या अत्याचारची सतत आठवण देखील तसेच समाज देखील तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिल यामुळे पीडितेने गर्भपात करण्याची याचिका दाखल केली होती. पीडिता म्हणाली, मुलाला जन्म देणे तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले होणार नाही.

 

कोर्टाने मुलीला सरकारी 'बालिका गृहात' दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत आणि प्रसूतीपूर्वी आणि नंतर चांगले जेवण आणि वैद्यकीय सेवा यासह सर्व आवश्यक बाबी प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर